अनुदान प्रलंबित; शेतकरी त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:41 AM2021-07-29T04:41:19+5:302021-07-29T04:41:19+5:30
पाणीपुरवठा विस्कळीत; नागरिक त्रस्त वाशिम : जुने शहरातील ध्रुव चौक परिसरात गेल्या काही दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. नागरिकांना ...
पाणीपुरवठा विस्कळीत; नागरिक त्रस्त
वाशिम : जुने शहरातील ध्रुव चौक परिसरात गेल्या काही दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी दोन ते तीन दिवस प्रतीक्षा करावी लागत असल्याने त्यांच्यात नाराजीचा सूर उमटत आहे.
नाला खाेलीकरण ठरले फायद्याचे
आसेगाव : तपोवन गावाने नाला खाेलीकरणाचे लाेकसहभागातून कामे करण्यात आली. यामध्ये नाला खोलीकरण करण्यात आले होते, ते नाले सध्या जाेरदार झालेल्या पावसाने तुडुंब भरलेली दिसून येत आहेत.
रस्त्यावर खड्डा; वाहन चालक त्रस्त
वाशिम : मालेगाव तालुक्यातील शिरपूर येथील शिरपूर पोलीस स्टेशन ते जानगीर महाराज संस्थानकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर खड्डा पडल्याने, वाहन चालकांची गैरसोय होत आहे.
जमिनीचा मोबदला देण्याची मागणी
वाशिम : लघू पाटबंधारे विभागांतर्गत उभारणी करण्यात येत असलेल्या उमरी प्रकल्पाकरिता संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला संपूर्ण शेतकऱ्यांना अद्याप मिळाला नाही. मोबदला देण्याची मागणी शेतकऱ्यांनी बुधवारी केली आहे.
शासकीय कार्यालयांमध्ये खबरदारीचा अभाव
वाशिम : कोरोनाचे विषाणू संसर्गाचे संकट अद्याप निवळलेले नाही. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून शासकीय कार्यालयांनी किमान थर्मल गनद्वारे येणाऱ्या नागरिकांची तपासणी करायला हवी. याकडे मात्र दुर्लक्ष केले जात आहे.