शेतीनिष्ठ शेतक-यांचा गौरव
By admin | Published: July 2, 2016 12:07 AM2016-07-02T00:07:35+5:302016-07-02T00:07:35+5:30
कृषीदिनाचे औचित्य साधून वाशिम जि.प. कृषी विभागाच्यावतीने जिल्ह्यातील ६0 शेतकरी पुरस्कृत.
वाशिम: स्थानिक स्वागत लॉन येथे शुक्रवारी कृषिदिनानिमित्त जिल्हा परिषद कृषि विभागाच्यावतीने जिल्हयातील ६0 शेतकर्यांचा शेतीनिष्ठ पुरस्कार देवून गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प. अध्यक्ष हर्षदा दिलिप देशमुख तर उद्घाटक म्हणून जि.प. सभापती सुभाषराव शिंदे, मार्गदर्शक म्हणून जिल्हा कारागृह अधिक्षक रामराजे चांदणे व अखिल भारतीय भाजीपाला उत्पादक महासंघ पुणेचे अध्यक्ष ङ्म्रीराम गाढवे, मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश जवादे, माजी जि.प.अध्यक्ष सोनाली जोगदंड, जि.प. सभापती चक्रधर गोटे, ज्योती गणेशपुरे , पानुताई जाधव, जिल्हा अधिक्षक कृषि अधिक्षक दत्तात्रय गावसाने प्रकल्प संचालक डी.एल.जाधव, कृषि संशोधन केंद्राचे सहयोगी प्राध्यापक डॉ.बी.डी.गिते, कृषि विज्ञान केंद्र करडाचे पिक संरक्षण विषयतज्ज्ञ राजेश डवरे, जि. प. सदस्य हेमेंद्र ठाकरे, माजी जि.प. अध्यक्ष दिलीपराव जाधव आदींची उपस्थिती होती. शेतकर्यांनी दुष्काळी परिस्थितीमुळे न घाबरता शेतात विविध प्रयोग करुन प्रगतीशिल शेती करावी असे आवाहन चांदणे व गाढवे यांनी केले. कार्यक्रमात सभापती शिंदे व मान्यवरांच्या हस्ते ६0 शेतकर्यांना शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार प्रदान करुन त्यांना सपत्नीक गौरविण्यात आले. प्रास्ताविक कृषि विकास अधिकारी आबासाहेब धापते व संचालन जि.प.सदस्य गजानन अमदाबादकर यांनी केले. शाहीर शेख यांनी स्वागत गिताने मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी सभापती शिंदे यांनी शेतकर्यांना मार्गदर्शन केले.