‘ग्रीन आर्मी’ ठेवणार वृक्षतोडीवर ‘वॉच’!

By admin | Published: March 12, 2017 01:58 AM2017-03-12T01:58:22+5:302017-03-12T01:58:22+5:30

३.५ हजार सक्रिय सदस्य; वन विभागाचीही वृक्षमाफीयांवर करडी नजर.

'Green Army' will keep 'watch' on trees! | ‘ग्रीन आर्मी’ ठेवणार वृक्षतोडीवर ‘वॉच’!

‘ग्रीन आर्मी’ ठेवणार वृक्षतोडीवर ‘वॉच’!

Next

सुनील काकडे
वाशिम, दि. ११- शासन स्तरावरून एकीकडे वृक्ष लागवड, संवर्धनावर विशेष भर दिला जात असताना दुसरीकडे मात्र काही समाजविघातक प्रवृत्तींकडून वृक्षांची सर्रास कत्तल केली जात आहे. त्यातही होळी या सणासाठी विशेषत: मोठमोठी वृक्ष तोडली जातात. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी यंदा ह्यग्रीन आर्मीह्ण अर्थात हरित सेनेचे तब्बल ३.५ हजार सदस्य सक्रिय राहणार आहेत. याशिवाय होळीपासून सलग तीन दिवस सकाळी ६ वाजेपासून वन विभागाचीही विशेष गस्त राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
वाशिम जिल्ह्यात वाशिम-रिसोड, मेडशी-मालेगाव आणि कारंजा-मानोरा असे तीन वनपरिक्षेत्र असून, २४ हजार ४९८ हेक्टर क्षेत्र वनाच्छादित आहे. वनांचा हा परिसर सागवानसह विविध वृक्षांनी व्यापलेला आहे. दरम्यान, वनांमधील वृक्षतोडीवर नियंत्रण मिळवून वृक्षसंवर्धन, संगोपन व्हायला हवे. यासह वृक्षलागवडीवर विशेष भर देण्याचे शासनाचे स्पष्ट निर्देश आहेत. त्यानुसार, सामाजिक वनीकरण आणि वन विभागाने संयुक्त प्रयत्न चालविले असून, त्यात बहुतांशी यशदेखील मिळत आहे.
त्याचाच एक भाग म्हणून होळी या सणाच्या औचित्यावर, मोठमोठय़ा वृक्षांच्या होणार्‍या बेसुमार कत्तलीवर नियंत्रण मिळविण्याकरिता प्रशासकीय पातळीवरून विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. ह्यमहाराष्ट्र हरित सेनाह्ण या अंतर्गत जिल्ह्यातील तीनही वन परिक्षेत्रांतर्गत सुमारे ३.५ हजार ह्यग्रीन आर्मी मेंबर्सह्णची ह्यऑनलाइनह्ण नोंदणी करण्यात आली आहे. हे सर्व सदस्य वृक्षतोडीवर नियंत्रण मिळविण्याकामी सक्रिय असणार आहेत. याशिवाय तीनही वनपरिक्षेत्रात होळीच्या दिवसापासून पुढे तीन दिवस सकाळपासून रात्री उशिरापर्यंंत वन विभागाच्या दोन चमू गस्तीवर राहणार आहेत. याशिवाय वन विभागाने वृक्षमाफीयांच्या मुसक्या आवळण्याकरिता १९२६ हा टोल फ्री क्रमांक जारी केला असून, वृक्षतोड अथवा वनांमध्ये शिकारीचे प्रकार घडत असतील तर नमूद क्रमांकावर संपर्क साधल्यास घटनांवर नियंत्रण मिळविणे शक्य होणार आहे.

शासनाच्या दिशानिर्देशानुसार गतवर्षीच्या जुलै महिन्यात जिल्ह्यात २.२२ लाख वृक्ष लागवड झाली. यापुढेही तीन वर्षांंत किमान ५ ते ६ लाख वृक्ष लागवडीचे नियोजन आहे. या वृक्षांसोबतच जंगलातील मोठमोठय़ा वृक्षांचे संरक्षण करण्यासाठी वन विभागाने सक्रिय पुढाकार घेतला आहे. त्यानुसार, वनपरिक्षेत्रात होळीच्या दिवसापासून पुढे सलग तीन दिवस दोन चमू सकाळपासून रात्री उशिरापर्यंंत वृक्षतोडीवर नियंत्रणासाठी गस्त घालणार आहेत.
- एस.आर.नांदुरकर, वन परिक्षेत्राधिकारी, वाशिम.

Web Title: 'Green Army' will keep 'watch' on trees!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.