ग्रीन सिटी’साठी ‘ग्रीन वाशिम’ उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 03:58 PM2019-05-18T15:58:47+5:302019-05-18T15:59:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : गतवर्षी देवतलाव स्वच्छता मोहीमेनंतर यावर्षी काळविट तलावातील गाळ व स्वच्छ करण्याच्या कार्याबरोबरच वाशिम ‘ग्रिन ...
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : गतवर्षी देवतलाव स्वच्छता मोहीमेनंतर यावर्षी काळविट तलावातील गाळ व स्वच्छ करण्याच्या कार्याबरोबरच वाशिम ‘ग्रिन सिटी’ बनविण्यासाठी ‘ग्रीन वाशिम’ उपक्रम मी वाशिमकर गृपने हाती घेतला आहे. याच्या पहिल्याच सभेला वाढता प्रतिसाद पाहता प्रभावी नियोजन आखण्यात येत असून याला प्रशासनाचेही सहकार्य लाभत आहे.
या संदर्भात १७ मे रोजी वाशिम येथे झालेल्या सभेमध्ये अनेक मान्यवरांनी व्यक्त केलेल्या विचारामधून वाशिम शहरात झाडे लावून ते जगवून शहरातील जास्तीत जास्त भाग हिरवेगार करण्याचा मानस मी वाशिमकर गृपच्यावतिने व्यक्त केला आहे. कोणतेही कार्य एकटया व्यक्तीने होवू शकत नाही हे सर्वश्रृत आहे. परंतु यापूर्वी वाशिमकर गृपने देवतलावाच्या कार्यात मिळालेला लोकसभाग, प्रशासनाचे सहकार्यामुळे कोणतीही गोष्ट शक्य नसल्याचे दाखवून दिले होते. त्याकरिताच हा पुढील अतिशय स्तुत्य उपक्रम राबविण्याच्या संकल्पनेचे सर्वत्र कौतूक होत असून स्वयंस्फुर्तीने नागरिक सहभागी होतांना दिसून येत आहेत. अनेक नागरिक या उपक्रमाची विचारणा करुन त्यात सहभागी होण्याचे बोलत आहेत. या उपक्रमाची सर्वांना माहिती व्हावी, नियोजनाबाबत विचार विनिमय व्हावा याकरिता मी वाशिमकर गृपच्यावतिने १९ मे रोजी सायंकाळी ८.३० वाजता मंत्री पार्क परिसरात असलेल्या प्रसिध्द श्री साई मंदिराच्या ध्यान मंदिरात सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेत सहभागी नागरिकांना हा उपक्रम यशस्वी व्हावा यासाठी विचार मांडण्याची मुभा देण्यात आली आहे. विशेष म्हणजे गतवर्षी देवतलावाच्या कार्यास सुरुवात केल्याबरोबर जोहरभाई नामक व्यक्तिने टिकास, फावडे, टोपले देवून आपला सहभाग दर्शविला होता, याहीवेळी त्यांनी सदर उपक्रमास सुरुवात होण्याआधिच शहरातील एका वसाहतीमधील संपूर्ण वृक्षाची देखभाल व संगोपनाची जबाबदारी त्यांनी घेतली. असेच कार्य सर्व वााशिमकर गृपचे सदस्य यशस्वीरित्या पार पाडत आहेत.
स्वयंस्फूर्तीने नागरिकांचा प्रतिसाद
वाशिमकर गृपच्यावतिने वाशिम सिटी ग्रीन करण्यासाठी हाती घेतलेल्या ग्रीन वाशिम उपक्रमासाठी स्वयंस्फुर्तीने नागरिक सहभागी होत असल्याचे दिसून येत आहे. पहिल्याच सभेला प्रतिसाद पाहता दुसºया सभेचे आयोजन १९ मे रोजी साई ध्यान मंदिर वाशिम येथे करण्यात आले आहे. यामध्ये विविध विषयांवर चर्चा होवून या उपक्रमाबाबत धोरण आखण्यात येणार आहे.
ओपन स्पेस एरिया बनणार ‘ग्रीन झोन’
मी वाशिमकर गृपच्यावतिने हाती घेण्यात आलेल्या ग्रीन वाशिम उपक्रमातर्गंत शहरात असलेल्या वसाहतींमधील ओपन स्पेस झाडे लावून व ते जागवून तो संपूर्ण परिसरत ग्रीन झोन बनविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी विशेष जबाबदारी सोपविण्यात येणार असल्याने व प्रशासनाचेही सहकार्य लाभत असल्याने वाशिम शहर हिरवेगार बनण्यास वेळ लागणार नसल्याचे बोलल्या जात आहे.