जिल्हाभरात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 06:10 AM2021-01-08T06:10:49+5:302021-01-08T06:10:49+5:30

मेडशी येथे ------ जि. प केंद्र शाळा कोठारी कोठारी: येथील जि.प. केंद्र शाळेसह तीन अंगणवाडी केंद्राच्या संयुक्त विद्यमाने ...

Greetings to Krantijyoti Savitribai Phule across the district | जिल्हाभरात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंना अभिवादन

जिल्हाभरात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंना अभिवादन

Next

मेडशी येथे

------

जि. प केंद्र शाळा कोठारी

कोठारी: येथील जि.प. केंद्र शाळेसह तीन अंगणवाडी केंद्राच्या संयुक्त विद्यमाने सावित्रीबाई फुले यांची जयंती महिला शिक्षण दिन म्हणून साजरी करण्यात आली. पूर्वतयारी म्हणून अगोदरच्या दिवशीच विद्यार्थ्यांच्या गृहभेटी घेऊन शिक्षकांनी कार्यक्रमाची माहिती दिली.

ग्रामपंचायत निवडणूक आचारसंहिता असल्यामुळे अंगणवाडी कर्मचारी व शिक्षकांच्या उपस्थितीत कार्यक्रम घेण्यात आला. शिक्षकांच्या सुचनेनुसार वर्ग १ ते ५ च्या विद्यार्थ्यांनी भाषणांचे व्हिडिओ आणि फोटो वर्गाच्या ग्रुपवर पाठविले. वर्ग ६ आणि ७ वीच्या विद्यार्थ्यांनी निबंध लेखन केले. अंगणवाडी केंद्राच्या कर्मचारी इंदूबाई रमेश वलोकार, किरण गजानन दुबळगुंडे व जि. प. केंद्र शाळा कोठारीचे मुख्याध्यापक ज्ञानदेव गवई यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

------------------

महिला बचत गट काजळेश्वर

काजळेश्वर उपाध्ये : आद्य महिला शिक्षिका, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती काजळेश्वर येथील बुद्ध विहारात महिला बचत गटाकडून साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जि.प. अध्यक्ष ज्योती गणेशपुरे, तर प्रमुख अतिथी म्हणून माजी सरपंच तथा सरला भगत बचत गटाच्या सुकेशिनी भगत, शशिकला रहाणे, ग्रा.पं. सदस्य सविता भगत आदि महिला उपस्थित होत्या. उपस्थित महिला मंडळांनी सर्वप्रथम क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून हारार्पण करीत त्यांना अभिवादन केले. यावेळी माया भगत, जया गवई, बेबी अंभोरे, सुरेखा खंडारे, सुमन खडसे, दुर्गा भगत, वच्छला इंगळे आदि महिलांची उपस्थिती होती.

---------

संकल्प ग्रामसंघ, समृद्धी ग्रामसंघ शिरपूर जैन

शिरपूर जैन: येथील संकल्प ग्रामसंघ व समृद्धी ग्राम संघाच्या महिला सदस्यांनी क्रांतिज्योती सावित्री फुले यांच्या जयंतीनिमित्त ३ जानेवारी रोजी अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यावेळी दोन्ही संघाच्या पदाधिकारी व महिलांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले.

--------------

शिवाजी विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय मोप

रिसोड: तालुक्यातील मोप येथील शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती महिला शिक्षण दिन म्हणून साजरी करण्यात आली.

सर्वप्रथम विद्यालयातील महिला शिक्षकांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला हारार्पण करून पूजन केले. यावेळी शिक्षिका रेखा करंगे, प्रियंका हजारे, जया चारथळ यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. प्राचार्य गजानन मुलंगे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमासाठी श्रीकृष्ण खरडे, सचिन देशमुख, शंतनू मोरे, भागवत नरवाडे आदींनी मोलाचे सहकार्य केले. सूत्रसंचालन सिद्धी सिकची, कोमल नरवाडे यांनी, तर आभार प्रियंका मोरे हिने मानले.

^^^^^^^^

आरोग्यवर्धिनी केंद्र, माळीपुरा उंबर्डा बाजार

उंबर्डा बाजार: येथील आरोग्य वर्धिनी केंद्र आणि माळीपुरा येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती ३ जानेवारी साजरी करण्यात आली.

आरोग्य वर्धिनी केंद्रात मान्यवरांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाला आरोग्य वर्धिनी केंद्र्राच्या संगीता बुरडे, संगीता इंगोले, इंगोले आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तथा आभार लालुवाले यांनी मानले. दरम्यान, गावातील माळीपुरा येथे महिला मंडळीकडून ३ जानेवारी रोजी सावता माळी सभागृहात सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपाच्या ओबीसी महिला मोर्चा अध्यक्ष दुर्गाबाई घोडे, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून भाजपा महिला आघाडीच्या चिटणीस विशाखा सावरकर उपस्थित होत्या. मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण करण्यात आले.

------------

महिला बचत गटांचा सन्मान

मेडशी: येथील नेताजी चौकात ३ जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले यांची जयंती महिला शिक्षण दिन म्हणून साजरी करताना महिला स्वयंसहाय्यता गटांच्या महिलांना सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा भेट देण्यात आल्या.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला सावित्रीबाईंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी समता परिषदेचे पश्चिम विदर्भ विभागीय अध्यक्ष प्रा. अरविंद गाभणे, जि.प. सदस्य लक्ष्मी प्रदीप तायडे, पं. स. सदस्य, कौशल्या साठे, प्रिया पाठक, माजी पं. स. सभापती शेख गनी, दत्ता घुगे, शेख जमीर, अभिजित मेडशीकर, धीरज मंत्री, ज्ञानेश्वर मुंडे, संदीप घुगे, कैलास इंगळे, सुभाष तायडे, संतोष साठे, विजय सोनोने, दीपक वानखडे, सलीम, शेख जावेद शेख अंसार, प्रसाद पाठक, संजय भागवत, विठ्ठल भागवत, गोरखनाथ भागवत आदिंसह तथागत महिला समूह (गट), बिरसा मुंडा महिला समूह, यशोधरा महिला समूह, रमाई महिला समूह, नवदुर्गा महिला समूह आदि महिला बचत गटांच्या सदस्य उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष तायडे यांनी, प्रास्ताविक प्रा. अरविंद गाभणे यांनी, तर आभार विठ्ठल भागवत यांनी मानले.

===Photopath===

040121\04wsm_1_04012021_35.jpg

===Caption===

जिल्हाभरात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंना अभिवादन

Web Title: Greetings to Krantijyoti Savitribai Phule across the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.