इंझोरीत सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 06:10 AM2021-01-08T06:10:51+5:302021-01-08T06:10:51+5:30

--------- भाजप युवा मोर्चा, वाशिम वाशिम : भारतीय जनता पार्टी व भाजप युवा मोर्चाकडून भाजप नेते राजू पाटील राजे ...

Greetings to Savitribai Phule in Injori | इंझोरीत सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

इंझोरीत सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

Next

---------

भाजप युवा मोर्चा, वाशिम

वाशिम : भारतीय जनता पार्टी व भाजप युवा मोर्चाकडून भाजप नेते राजू पाटील राजे यांच्या जनसंपर्क कार्यालयात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. राजू पाटील राजे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी विपरित परिस्थितीत स्रीशिक्षणासाठी केलेले कार्य हे अत्यंत महत्त्वाचे होते. त्यांच्या या कार्यामुळेच आज प्रत्येक समाजातील स्रीशिक्षणामुळेच स्वत:च्या पायावर खंबीरपणे उभी आहे. स्रीशिक्षणाचा पाया घट्ट करून सावित्रीबाई फुले यांनी जे कार्य केले ते अत्यंत मोलाचे होते, असे मत राजू पाटील राजे यांनी व्यक्त केले. यावेळी भाजप शहराध्यक्ष राहुल तुपसांडे, सूरज चौधरी, सुधीर मोरे, रफिक भाई आदी पदाधिकारी उपस्थित होते.

------

ग्रामपंचायत कार्यालय, धानोरा बु.

मानोरा : तालुक्यातील धानोरा बु. येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी अश्विनी वानखडे, तर प्रमुख अतिथी म्हणून धनेश्वर राऊत, प्रवीण नारिंगे, ग्रामपंचायत सदस्य नंदिनी पऊळ, कोमल राऊत उपस्थिती होत्या. कार्यक्रमाचे आयोजन डॉ. विनोद राऊत यांनी केले होते. सूत्रसंचालन प्रमोद पऊळ यांनी केले. या कार्यक्रमात सुधीर थेर या चिमुकल्याने महात्मा जोतिबा फुले यांची, तर श्रावणी नीलेश राऊत हिने सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा केली होती.

---------

राष्ट्रभावना जनजागृती प्रबुद्ध एकता सेवा समिती, चेहेल

मंगरूळपीर : तालुक्यातील चेहेल येथील राष्ट्रभावना जनजागृती प्रबुद्ध एकता सेवा समितीकडून क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून रिपाइं आठवले गट मंगरूळपीर तालुका अध्यक्ष तुकाराम खडसे (सत्यवादी) व आशाबाई खडसे यांची प्रमुख उपस्थिती होती. आशाबाई खडसे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी तुकाराम खडसे, समितीचे अध्यक्ष भास्कर सोनोने, समितीचे उपाध्यक्ष पंडित सोनोने, सचिव प्रा. प्रफुू्ल्ल इंगोले, कोषाध्यक्ष साहेबराव सोनोने, सविता डापसे, लक्ष्मीबाई मनवर, नंदाताई सोनोने व ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अखेरीस पूज्य भन्ते विजयबोधी यांचा धम्मदेशनेचा कार्यक्रम घेण्यात आला.

-------------

सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त मोफत कराटे प्रशिक्षण

मंगरूळपीर : येथील ध्यास कार्यालयात सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त मुली व महिलांसाठी एकदिवसीय मोफत कराटे प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.

ध्यास संपर्कप्रमुख तथा लेकीबाळी अब्रूरक्षा क्रांती बंड युवती आघाडीच्या जिल्हा समन्वयक अश्विनी औताडे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाला पोलीस उपनिरीक्षक मंजूषा मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी वाशिम येथील कराटे प्रशिक्षक गायत्री डिग्रसकर व सोनू राठोड यांनी महिला व मुलींना कराटे प्रशिक्षण देऊन प्रात्यक्षिक करून दाखविले. कार्यक्रमाला शारदा पातळे, सीमा गावंडे, नंदा गावंडे, रूपाली जाधव, गंगा ठाकरे, चंद्रकला ठाकरे, सुनीता हरणे, मेघा राऊत, पातूरकर, साखरे, जानव्ही औताडे, कल्याणी, काळे, आकांक्षा भालेराव,अबोली घळे, कल्याणी साखरे, उन्नती अग्रवाल, वैभवी पाकधने, सायली पाटील, नेतल बाहेती आदी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन अश्विनी अवताडे यांनी केले.

Web Title: Greetings to Savitribai Phule in Injori

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.