खुल्या बाजारात जाणारा रेशनचा गहू पकडला

By admin | Published: June 24, 2015 01:44 AM2015-06-24T01:44:41+5:302015-06-24T01:44:41+5:30

तिघांविरुद्ध पोलिसांनी गुन्हे नोंदविले.

Grip ration of wheat in open market | खुल्या बाजारात जाणारा रेशनचा गहू पकडला

खुल्या बाजारात जाणारा रेशनचा गहू पकडला

Next

वाशिम : स्वस्त धान्य दुकानदाराने आपल्या दुकानामधीलच लाभार्थ्यांंचा गहू दोघांच्या संगनमताने खुल्या बाजारात विक्री करण्याचा प्रयत्न करणार्‍या तिघांविरुद्ध पोलिसांनी गुन्हे नोंदविले. पोलिसांनी १0 क्विंटल गहू व पाच लाख रुपये किमतीचे वाहन असा एकूण ५ लाख १0 हजारांचा माल जप्त केला. ही घटना २३ जून रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. रिसोड तालुक्यातील कोयाळी खुर्द येथील स्वस्त धान्य दुकानदार तानाजी बोरकर यांनी दहा क्विंटल गहू विश्‍वनाथ तुकाराम ठोंबरे व देवानंद कचरू साळवे यांच्याकडे खुल्या बाजारात विक्री करण्यासाठी दिला होता. याबाबत माहिती गावातीलच काही नागरिकांना मिळाली. याशिवाय वाशिम शहर पोलीस ठाण्याला दूरध्वनी करून रेशनचा गहू वाशिम शहराकडे एम.एच. ३७ जे. २४२ क्रमांकाचे वाहनातून घेऊन येत असल्याची माहिती दिली. पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता, त्यामध्ये दहा क्विंटल गहू आढळून आला. या घटनेत वाशिम शहर पोलीस ठाण्यात विश्‍वनाथ ठोंबरे, देवानंद साळवे व दुकानदार तानाजी बोरकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: Grip ration of wheat in open market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.