दोन हजार एकर भुईमूग; हजार एकरावरील संत्रा धोक्यात!

By admin | Published: March 31, 2017 02:27 AM2017-03-31T02:27:08+5:302017-03-31T02:27:08+5:30

भारनियमनासह विजेच्या इतर समस्यांमुळे ही पिके धोक्यात सापडली असून, शेतकर्‍यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.

Ground two thousand acres; Thousand acre orange dangers! | दोन हजार एकर भुईमूग; हजार एकरावरील संत्रा धोक्यात!

दोन हजार एकर भुईमूग; हजार एकरावरील संत्रा धोक्यात!

Next

मालेगाव(जि. वाशिम), दि. ३0- तालुक्यातील वारंगी, गोकसावंगी, रिधोरा आणि मुंगळा या प्रत्येक गावामध्ये किमान पाचशे एकर क्षेत्रावर भुईमूग; तर मुंगळा येथे सुमारे एक हजार एकर परिसरात संत्र्याच्या बागा उभ्या आहेत; मात्र भारनियमनासह विजेच्या इतर समस्यांमुळे ही पिके धोक्यात सापडली असून, शेतकर्‍यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. संबंधित चारही गावांमधील पिकांना आवश्यक असलेले पाणी शेतकर्‍यांकडे उपलब्ध आहे; मात्र सध्या सुरू असलेल्या विजेच्या विविध समस्यांमुळे त्यांना सिंचन करता येणे कठीण झाले आहे. दिवसेंदिवस वाढत्या उष्णतेमुळेही पिके धोक्यात सापडली आहेत. ही बाब लक्षात घेऊन किमान काही दिवस भारनियमन टाळून शेतकर्‍यांना दिलासा द्यावा, अशी मागणी परिसरातील शेतकर्‍यांनी महावितरणकडे गुरुवारी केली.

Web Title: Ground two thousand acres; Thousand acre orange dangers!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.