बियाणे भेसळीच्या प्रकरणांत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2017 08:16 PM2017-09-08T20:16:54+5:302017-09-08T20:17:08+5:30
तालुक्यात महाबीजच्या बियाण्यांतील भेसळीच्या प्रकरणांचा आकडा अधिक वाढला आहे. विशेष म्हणजे महाबीजच्या ज्या लॉटमधील बियाण्यांत भेसळ झाल्याची तक्रार करण्यात आली होती. त्या लॉटमधील बियाणे पेरणाºया शेतकºयाच्या शेतात कृषी विभाग आणि महाबीजच्या प्रतिनिधीने भेट दिली असता. दोन शेतकºयांच्या शेतात भेसळ असल्याचे दिसून आले. त्यामुळे या संदर्भातील शेतकºयांनी केलेल्या तक्रारीत तथ्य असल्याचे स्पष्ट झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: तालुक्यात महाबीजच्या बियाण्यांतील भेसळीच्या प्रकरणांचा आकडा अधिक वाढला आहे. विशेष म्हणजे महाबीजच्या ज्या लॉटमधील बियाण्यांत भेसळ झाल्याची तक्रार करण्यात आली होती. त्या लॉटमधील बियाणे पेरणाºया शेतकºयाच्या शेतात कृषी विभाग आणि महाबीजच्या प्रतिनिधीने भेट दिली असता. दोन शेतकºयांच्या शेतात भेसळ असल्याचे दिसून आले. त्यामुळे या संदर्भातील शेतकºयांनी केलेल्या तक्रारीत तथ्य असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मंगरुळपीर तालुक्यातील चांभई येथील शेतकरी गोविंदा भगत यांनी यंदाच्या खरीप हंगामात खरेदी विक्री समितीमधून पेरणीसाठी महाबीजचे ९३०५ वाणाचे तीन बॅग सोयाबीन विकत घेतले होते. सदर बियाणे उगविल्यानंतर त्यामध्ये दुसºया वाणाची झाडे मोठ्या प्रमाणात उगविल्याचे त्यांना दिसले. या संदर्भात त्यांनी मंगरुळपीर पंचायत समितीच्या कृषी अधिकाºयांकडे तक्रार केल्यानंतर काही दिवसांनी कृषी शास्त्रज्ञ, तालुका कृषी अधिकारी, तसेच पंचायत समितीच्या कृषी अधिकाºयांनी त्यांच्या शेताची प्रत्यक्ष पाहणी केली असता. गोविंदा भगत यांच्या शेतात ९३०५ हे वाण ३० टक्के, तर इतर मिश्र वाण ७० टक्के असल्याचे दिसले. हाच प्रकार वाडा फार्म शिवारातील चार शेतकºयांसोबत घडला. त्यांच्या शेतात भेसळीचे प्रमाण कमी असल्याचे कृषी विभागाच्या पाहणी करणाºया अधिकाºयांना दिसले. त्यावरून गोविंदा भगत यांच्यासह पाचही शेतकºयांबाबत घडलेल्या प्रकाराचा एक संयुक्त अहवाल पंचायत समितीच्या कृषी अधिकाºयांनी तयार करून वरिष्ठ अधिकाºयांकडे पाठविला. उपरोक्त शेतकरी गोविंदा भगत यांनी खरेदी विक्री समितीकडून ज्या लॉटमधील बियाणे खरेदी केले, त्याच लॉटमधील बियाणेमंगरुळपीर तालुक्यात सायखेडा येथील शेतकºयांनीही खरेदी केले होते. त्यामुळे कृषी विभागाच्या अधिकाºयांनी सायखेडा येथील संंबंधित शेतकरी पुरुषोत्तम काळे आणि गजानन भगत यांच्या शेतांची पाहणी करण्याचे ठरविले. कृषी विभागाने सायखेडा येथील ज्या शेतकºयांच्या शेतामधील सोयाबीनची पाहणी केली. त्यामधील पुरुषोत्तम काळे यांच्या शेतात २८ टक्के, तर गजानन काळे यांच्या शेतात १५ टक्के भेसळ असल्याचेही स्पष्ट झाले.