"जीएसटी" आकारणीबाबत संभ्रम कायम; व्यापाऱ्यांनी पुकारला बंद!
By admin | Published: July 3, 2017 08:14 PM2017-07-03T20:14:04+5:302017-07-03T20:14:04+5:30
कारंजा लाड : वस्तू व सेवा कराच्या कर आकारणी संभ्रमामुळे कारंजा कृषी उत्पन्न बाजार समिती अतंर्गत येणा-या व्यापाऱ्यांनी बंद पुकारल्यामुळे शेतक-यांची कोंडी झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा लाड : वस्तू व सेवा कराच्या कर आकारणी व्यापाऱ्यांमधील संभ्रम कायम आहे. या संभ्रमामुळे कारंजा कृषी उत्पन्न बाजार समिती अतंर्गत येणा-या व्यापाऱ्यांनी बंद पुकारल्यामुळे शेतक-यांची कोंडी झाली आहे.
१ जुलैपासून वस्तु व सेवा कर (जीएसटी) लागू झाला. त्यांचे उल्लंघन केल्यास शिक्षा होण्याची शक्यता असल्याने जी.एस.टी नेमका कुणी भरायचा, कसा व किती आकारायचा याबाबत व्यापारी व दलाल गोंधळलेल्या अवस्थेत आहे. या पुर्वी अडत शेतक-यांकडून घेतली जायची तेव्हा ते उत्पन्न उडत या शिर्षकात यायचे, ही अडत व्यापाऱ्यांकडून वसुल केली जात असल्याने त्याला कमीशन असे नाव आले. त्यामुळे या कमीशनवर जी.एस.टी कीती आकारायची, बाहेर गावच्या व्यापा-यांच्या वतीने प्रातिनिधीक स्वरूपात खरेदी करणाऱ्या स्थानिक व्यापा-यांना मोठया व्यापा-यांकडून मिळणा-या कमिशनवर किती जीएसटी आकारायची हे चित्र स्पष्ट नसल्याने संपूर्ण बाजारात संदिग्ध अवस्था निर्माण झाली आहे. त्यामुळे बेमुदत बंदचे शस्त्र व्यापा-यांनी उगारले आहे. खरीप पिकांच्या लागवडीच्या वेळी शेतमाल व धान्य विक्री बंद झाल्याने बियाने खरेदी व रासायनिक खते किटकनाशके खरेदीवर याचा विपरित परीणाम होत आहे. हताश झालेला शेतकरी तीव्र असंतोष व्यक्त करीत आहे.