शिक्षकांच्या प्रश्नावर पालकमंत्री आक्रमक
By admin | Published: July 4, 2015 12:09 AM2015-07-04T00:09:05+5:302015-07-04T00:09:05+5:30
‘त्या’अधिका-यांवर कारवाई करण्याचे पालकमंत्री पाटील यांचे आदेश.
वाशिम: शासकीय विश्रामगृहात ३ जुलै रोजी आयोजित बैठकीत शिक्षकांच्या अडचणी जाणून घेतल्यानंतर पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील आक्रमक झालेत. जिल्ह्यातील शिक्षकांचे कामे जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवणार्या शिक्षण विभागातील संबंधित अधिकारी, कर्मचार्यांना कारणे दाखवा नोटीस देवून त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना शिक्षण विभागातील अधिकार्र्यांना दिल्या. शासकीय विश्रामगृहात आयोजित केलेल्या शिक्षक व शिक्षक संघटनांसोबत संवाद साधण्यासाठी आयोजित बैठकीमध्ये पालकमंत्नी यांनी शिक्षकांच्या अडचणी जाणून घेतलत. यावेळी शिक्षण विभागाचे उपसंचालक पवार, प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी अंबादास पेंदोर, माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी दिनेश तरोळे यांच्यासह शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्नी डॉ. पाटील यांनी शिक्षकांचे अनेक प्रश्न प्रशासकीय स्तरावर प्रलंबित असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. यामध्ये वैद्यकीय मदतीची देयके, जीपीएफविषयीचे प्रश्न, खासगी शाळांमधील शिक्षकांचे अनियमित वेतन इत्यादी बाबींचा समावेश आहे. याविषयी शिक्षण विभागाने तातडीने कायर्वाही करून शिक्षकांचे प्रश्न लवकरात लवकर सोडविण्यावर भर द्यावा. तसेच याबाबत झालेल्या कायर्वाहीचा अहवाल नियमितपणे सादर करण्याच्या सूचनाही दिल्या. शिक्षण विभागातील काही अधिकारी, कर्मचारी शिक्षकांना चुकीची माहिती देवून त्यांची दिशाभूल करीत असल्याची तक्रार यावेळी काही शिक्षकांनी केली. यावर पालकमंत्नी डॉ. पाटील यांनी संबंधित अधिकारी, कर्मचार्यांना कारणे दाखवा नोटीस देण्याची सूचना शिक्षणाधिकार्यांना दिल्या.