पालकमंत्र्यांनी साधला शिवसैनिकांशी संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:25 AM2021-07-22T04:25:29+5:302021-07-22T04:25:29+5:30
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार भावना गवळी होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार गोपीकिशन बाजोरिया, शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेश मापारी, महिला आघाडीच्या मंगला ...
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार भावना गवळी होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार गोपीकिशन बाजोरिया, शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेश मापारी, महिला आघाडीच्या मंगला सरनाईक, तालुका प्रमुख रामदास मते पाटील यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक रिसोड तालुका प्रमुख महादेवराव ठाकरे यांनी केले. यावेळी पालकमंत्री देसाई म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विचार जिल्ह्यातील प्रत्येक घरात पोहोचले पाहिजेत. मुख्यमंत्री ठाकरे यांना मागील वर्षी जिल्ह्यातील प्रत्येक शिवसैनिकासोबत संपर्क साधावयाचा होता. मात्र, कोरोनामुळे लॉकडाऊन लागल्यामुळे संपर्क साधता आला नाही. शासनाच्या तिजोरीत पुरेशी रक्कम शिल्लक नसतानासुद्धा कोरोना आजारासाठी सर्व सरकारी रुग्णालयांत सुविधा पुरविल्या. देशातील तीन एजन्सी मिळून कोरोनामध्ये केलेल्या कामाचे मूल्यमापन केले. त्या मूल्यमापनामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ठाकरे यांना प्रथम क्रमांक मिळाला आहे, असेही पालकमंत्री म्हणाले. यावेळी रवी भांदुर्गे, भागवतराव गवळी, दत्ता पाटील तुरक, महादेव सावके, रवी पवार आदींसह मोठ्या संख्येत शिवसैनिक उपस्थित होते.
---------------------------सर्वांनी प्रयत्नरत राहण्याची गरज - गवळी
वाशिम जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्यामुळे सर्वसामान्यांची कामे व्हावीत याकरिता स्थानिक स्वराज्य संस्थेपासून, तर येथील आमदारापर्यंत शिवसैनिकांची वर्णी लागावी याकरिता सर्वांनी प्रयत्नरत राहण्याची गरज असल्याचे खासदार भावना गवळी यावेळी म्हणाल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसंपर्क अभियानांतर्गत सगळ्यांशी संपर्क व्हावा यासाठी हे अभियान सुरू केल्याचेही त्यांनी सांगितले.
-----------------------------------------
७० टक्के समाजकारण व ३० टक्के राजकारण
हिंदुहृदयसम्राट व शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी ७० टक्के समाजकारण व ३० टक्के राजकारण केले. सर्वप्रथम कोरोनामध्ये शिवसैनिक रस्त्यावर उतरला. महाराष्ट्रात रक्तदानासाठी सर्वप्रथम शिवसैनिकांनी रक्तदान केले. गरिबाला धान्य शिवसैनिकांनी दिले. एकनाथ शिंदे यांनी कोविडकाळात रुग्णवाहिका दिल्या. शिवसेना घट्ट करण्यासाठी सर्वांनी काम करायचे असून, पक्ष व संघटन वाढीसाठी शिवसैनिकांनी प्रयत्न केले पाहिजेत, असे ते म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १८ वर्षांच्या वर नागरिकांना लसीकरणासाठी साडेपाच हजार कोटी रुपये दिले. ऑटो चालकांना आर्थिक मदत दिली, कोकणामध्ये चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानभरपाईसाठी एक हजार कोटी रुपयांची मदत दिली, तसेच स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने जिल्ह्यात एक नंबरचे कृषी प्रशिक्षण संकुल मंजूर केल्याचेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा खा. गवळी यांनी मनोगतात कोरोनाच्या संकटामुळे भेटीगाठीमध्ये कमी-जास्त झाले असेल आपल्या शिवसेनेची कार्यप्रणाली शिवसैनिक, शाखाप्रमुखापासून जिल्हाप्रमुखापर्यंत आपण एक साखळी असून, पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसंपर्क अभियानांतर्गत सगळ्यांशी संपर्क व्हावा यासाठी हे अभियान सुरू केले असून, वाशिम जिल्हा, तर शिवसेनेचा बालेकिल्ला असल्यामुळे सर्वसामान्यांची कामे व्हावीत याकरिता स्थानिक स्वराज्य संस्थेपासून ते येथील आमदारांपर्यंत शिवसैनिकांची वर्णी लागावी याकरिता सगळ्यांनी प्रयत्नरत राहण्याची गरज असल्याचे त्या म्हणाल्या. या शिवसंपर्क मोहीम आढावा बैठकीला रवी भांदुर्गे, भागवतराव गवळी, दत्ता पाटील तुरक, महादेव सावके, रवी पवार, उद्धवराव गोडे, विलास सुरडकर, बाळासाहेब देशमुख, विजय खानझोडे, बालाजी वानखडे, आकाश कांबळे, वाशिम शहर प्रमुख गजानन भांदुर्गे, युवा सेना शहर प्रमुख गजानन ठेंगडे, अरुण मगर, गणेश बाबरे, गोपाल पाटील येवतकर, डॉ.करसडे, भारत घुगे, देवा राऊत, अकील तैली, राजाभैया पवार, राजू धोंगडे, गणेश पवार, मोहन देशमुख, चंदू खेलूरकर,नगरसेवक ॲड.विनोद खंडेलवाल,उमेश मोहळे,कैलास गोरे,अतुल वाटाणे,मधू इरतकर,राजू भांदुर्गे,बापू ठाकूर,उत्तम पोटफोडे,अशोक शिराळ आदींसह मोठ्या संख्येत शिवसैनिक उपस्थित होते.
------------------------
विकासकामांचे भूमीपूजन वाशिम येथील पुसद नाका ते मन्नासिंह चौक या रस्त्याचे भूमिपूजन पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्या हस्ते करण्यात आले, तसेच जुन्या नगर परिषदजवळ वाॅर्ड नं.१० व ११ मध्ये रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी विधान परिषदेचे आमदार गोपीकिशन बाजोरिया, शिक्षक आमदार ॲड. किरणराव सरनाईक, नगर परिषदेचे उपाध्यक्ष बापू ठाकूर, माजी नगराध्यक्ष सुरेश लोध, सुभाष गट्टाणी, मिलिंद भावसार, जिल्ह्यातील प्रतिष्ठित व्यक्ती, नगरसेवक, तसेच आजी-माजी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.