शिक्षकांच्या बदलीसंदर्भात पालक धडकले जिल्हा परिषदेवर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 08:20 PM2017-11-14T20:20:09+5:302017-11-14T20:20:57+5:30
वाशिम तालुक्यातील साखरा येथील जिल्हा परिषद शाळेवरील शिक्षकांच्या बदल्या रद्द करण्याच्या मागणीसाठी पालकांनी मंगळवारी जिल्हा परिषद कार्यालय गाठले. यावेळी शिक्षण सभापती व शिक्षणाधिकाºयांशी चर्चा करून बदलीसंदर्भात तोडगा काढण्याची मागणी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम - वाशिम तालुक्यातील साखरा येथील जिल्हा परिषद शाळेवरील शिक्षकांच्या बदल्या रद्द करण्याच्या मागणीसाठी पालकांनी मंगळवारी जिल्हा परिषद कार्यालय गाठले. यावेळी शिक्षण सभापती व शिक्षणाधिकाºयांशी चर्चा करून बदलीसंदर्भात तोडगा काढण्याची मागणी केली.
साखरा येथील जिल्हा परिषद शाळेला आदर्श बनविण्यात मोलाची भूमिका घेणाºया शिक्षकांची बदली शासनाच्या निर्णयानुसार आॅनलाईन प्रक्रियेने झाली आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती वर्तविली पालकांनी सदर शिक्षकांची बदली रद्द करण्यात यावी, या मागणीसाठी १४ नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषदेवर धडक दिली. यावेळी शिक्षण व आरोग्य सभापती सुधीर पाटील गोळे, शिक्षणाधिकारी अंबादास मानकर यांच्याशी बाजार समिती संचालक राजूभाऊ चौधरी, निवृत्ती पाटील राऊत, नामदेवराव इंगळे यांच्यासह गावकºयांनी चर्चा केली. साखरा येथील जिल्हा परिषद शाळा आदर्श बनविण्यात बदली झालेल्या शिक्षकांनी काय-काय योगदान दिले, याची माहिती सभापती व शिक्षणाधिकाºयांना दिली. विद्यार्थी व शिक्षकांची नाळ जुळलेली असून, अध्ययन-अध्यापन प्रक्रिया सुलभरित्या सुरू आहे. शासनाच्या आॅनलाईन बदली धोरणाने साखरा येथील शिक्षकांच्या बदल्या होणार असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती पालकांनी व्यक्त केली. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची दक्षता म्हणून शिक्षकांच्या बदल्या रद्द करण्यात याव्या, अशी मागणी पालकांनी केली. यावर योग्य तो तोडगा काढण्याचे आश्वासन सभापती गोळे व शिक्षणाधिकारी मानकर यांनी गावकºयांना दिले.