‘पोलीस रेझिंग-डे’निमित्त सायबर क्राईमविषयी मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2019 02:07 PM2019-01-04T14:07:23+5:302019-01-04T14:08:21+5:30
मालेगाव (वाशिम) : पोलीस रेझींग डे निमित्त मालेगाव पोलीस स्टेशनच्यावतीने मुंदडा महाविद्यालयात ३ जानेवारी रोजी सायबर गुन्हेगारी व वाहतुक नियमांचे पालन या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव (वाशिम) : पोलीस रेझींग डे निमित्त मालेगाव पोलीस स्टेशनच्यावतीने मुंदडा महाविद्यालयात ३ जानेवारी रोजी सायबर गुन्हेगारी व वाहतुक नियमांचे पालन या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.
पोलीस रेझिंग डेच्या औचित्यावर सायबर क्राईमबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात मालेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार पितांबर जाधव म्हणाले की, सायबर क्राईमबाबत अनेकांना माहिती नसल्याने त्या संदभार्तील गुन्ह्यामधे वाढ होत आहे. त्यामुळे युवावर्ग विशेषत: शालेय विद्यार्थ्यांनी खबरदारी बाळगून अॅन्ड्रॉइड फोनचा सावधगिरीने वापर करण्याची आवश्यकता आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य वसंतराव अवचार, तसेच पोलीस उपनिरीक्षक गिरीश तोगरवाड, पर्यवेक्षक प्रा. विवेक सावजी, यांची प्रमुख उपस्थीती होती. यावेळी पुढे बोलताना ठाणेदार जाधव पुढे म्हणाले की, पालकांनी आपल्या पाल्याला अॅन्ड्रॉईड मोबाईल शक्यतो देण्याचे टाळले पाहिजे कारण या फोनचा चांगल्या गोष्टीसाठी वापर होण्याऐवजी त्याचा गैरवापर होण्याचे प्रमाण वाढत आहे. आपला पाल्य या फोनचा कसा व कशासाठी वापर करतो हेसुद्धा पालकांनी बघणे गरजेचे आह, तसेच रस्त्याने चालताना वाहतुकीच्या नियमांचे पालन केले पाहिजे कारण आपला जीव सर्वात महत्वाचा आहे, असेही ते म्हणाले. अध्यक्षीय भाषण प्राचार्य वसंतराव अवचार यांनी केले. कार्यक्र माचे प्रास्ताविक पोकॉ गजानन काळे यांनी, तर संचालन प्रा. वाहेकर यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा पिंपळकर यांनी केले. यावेळी कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी व विद्यार्थीनींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.