‘बेटर टुमारो फाउंडेशन’ करणार स्पर्धापरिक्षेचे मार्गदर्शन
By admin | Published: April 8, 2017 05:37 PM2017-04-08T17:37:43+5:302017-04-08T17:37:43+5:30
"बेटर टुमारो फाउंडेशन" या संस्थेच्यावतीने ग्रामीण भागातील युवकांना मोफत स्पर्धा परीक्षेसह संगणकीय मार्गदर्शन देण्यासाठी "स्टडी सर्कल"ची स्थापना करण्यात आली आहे.
रिसोड: "बेटर टुमारो फाउंडेशन" या संस्थेच्यावतीने ग्रामीण भागातील युवकांना मोफत स्पर्धा परीक्षेसह संगणकीय मार्गदर्शन देण्यासाठी "स्टडी सर्कल"ची स्थापना करण्यात आली आहे.
भाजपा प्रदेश सरचिटणीस रामदास अंबडकर यांच्याहस्ते या स्टडी सर्कलचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी अॅड. विजयराव जाधव, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष नारायणराव सानप, लखनसिंह ठाकुर, वाशिम नगरपरिषदेचे उपाध्यक्ष बंटी वाघमारे, रिसोड पंचायत समितिी सभापती प्रशांत खराटे, शहराध्यक्ष विनोद जोशी, भाजपा तालुका अध्यक्ष प्रशांत देशमुख, आदिंची उपस्थिती होती. भाजपा प्रदेश सरचिटणीस रादास अंबडकर म्हणाले की या स्टडी सर्कलच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक तसेच संगणकीय ज्ञान मिळणार आहे व याचा फायदा त्यांच्या करिअरसाठी होऊन ते स्पर्धात्मक परिक्षा देण्यास सक्षम होणार आहेत. त्यामुळे "बेटर टुमारो फाउंडेशन"ने सुुरू केलेला हा उपक्रम स्तुत्य ठरणार आहे.