भर जहागीर येथे आचारसंहिताबाबत मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:51 AM2021-07-07T04:51:32+5:302021-07-07T04:51:32+5:30
येथिल ग्रामपंचायत कार्यालयामध्ये पोलीस निरीक्षक सोहम जाधव यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष नेमणार यांनी गावातील नागरिकांना आगामी जिल्हा परिषद ...
येथिल ग्रामपंचायत कार्यालयामध्ये पोलीस निरीक्षक सोहम जाधव यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष नेमणार यांनी गावातील नागरिकांना आगामी जिल्हा परिषद निवडणूक आचारसंहिता व डेल्टा विषाणू संदर्भात मार्गदर्शन केले. निवडणूक म्हटली की काही अतिउत्साही कार्यकर्ते मद्यधुंद अवस्थेत वादग्रस्त भूमिकांचे समर्थन करतात. तेव्हा कुठल्याही व्यक्तीकडून एखादी विपरीत घटनेचे समर्थन केल्यास त्यांच्यावर नियमानुसार कारवाई केल्या जाईल. प्रत्येक नागरिकाने शासनाच्या विविध नियमावलीची काळजी घेणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. यावेळी रवींद्र चोपडे, विजय चोपडे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सत्यनारायण महादेव जायभाये, माजी जि.प. सदस्य किसन गिते, अर्जुन गिते, विष्णू गिते, विलास तायडे, संदीप भालेकर, वामण भालेकर, अमर थळकरी, रामेश्वर मुरकुटे, वैभव भालेकर, गणेश चोपडे, नितीन जिरवणकर यासह अनेक युवकांची उपस्थिती होती.