भर जहागीर येथे डिजिटल साक्षरतेबाबत मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:27 AM2021-07-04T04:27:44+5:302021-07-04T04:27:44+5:30

कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून शाळेचे प्राचार्य मुलंगे, पोलीस पाटील संतोष घायाळ, सरपंच भागवत नरवाडे, वित्तीय व्यवसाय प्रवर्तक गजानन खंदारे, ...

Guidance on Digital Literacy at Bhar Jahagir | भर जहागीर येथे डिजिटल साक्षरतेबाबत मार्गदर्शन

भर जहागीर येथे डिजिटल साक्षरतेबाबत मार्गदर्शन

Next

कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून शाळेचे प्राचार्य मुलंगे, पोलीस पाटील संतोष घायाळ, सरपंच भागवत नरवाडे, वित्तीय व्यवसाय प्रवर्तक गजानन खंदारे, शाखा व्यवस्थापक मुळे आदींची उपस्थिती होती.

स्थानिक महिला बचत गट बँकेचे ग्राहक व गावकरी यांच्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मान्यवरांनी डिजिटल साक्षरता व वित्तीय साक्षरता म्हणजे कार्य याबाबतची माहिती उपस्थितांना दिली. दोन तास चाललेल्या या कार्यक्रमात उपस्थितांना आर्थिक साक्षरता, समावेशन, समुपदेशन इत्यादीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी महिला ग्राम संघाचे पदाधिकारी व सदस्य महिला बचत गटांच्या सदस्यांसह कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक गजानन नरवाडे, खरेदी-विक्रीचे संचालक डॉक्टर अभिमन्यू नरवाडे, सेवा सहकारी सोसायटीचे माजी अध्यक्ष दत्तराव नरवाडे, शाळेचे शिक्षक, बँकेचे निरीक्षक सोळंके, रोखपाल पारवे सचिव व गटसचिव हाडे, जाधव, अमोल वाढवे व आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन व आभार संचालक भगवान मोरे यांनी केले.

Web Title: Guidance on Digital Literacy at Bhar Jahagir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.