शेती दिन कार्यक्रमात शेतकऱ्यांना मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 04:19 AM2021-01-24T04:19:44+5:302021-01-24T04:19:44+5:30
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तोटावार व उपविभागीय कृषी अधिकारी चौधरी यांच्या आदेशानुसार शेतीशाळा प्रशिक्षक मंगेश सुरजूसे ...
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तोटावार व उपविभागीय कृषी अधिकारी चौधरी यांच्या आदेशानुसार शेतीशाळा प्रशिक्षक मंगेश सुरजूसे यांनी कृषी विभागाच्यावतीने वाई येथे शेती दिनाचे आयोजन केले होते.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय कृषी अधिकारी चौधरी तसेच मार्गदर्शक म्हणून के.व्ही.के. कीटकशास्त्रज्ञ तथा शेतीशाळा समन्वयक आर एस डवरे यांची उपस्थिती होती. चौधरी यांनी उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधून त्याचे तीन वर्षातील अनुभव, आलेले उत्पादन, अंगीकारलेले नवनवीन तंत्रज्ञान व त्याचे फायदे, होस्ट फार्मर व गेस्ट फार्मर यांना आतापर्यंत मिळालेले अनुदान, प्रलंबित असलेल्या अर्जाची स्थिती इत्यादी विषयांवर आढावा घेतला व उपस्थित शेतकऱ्यांना औवजारे, बॅंक बाबत माहिती देऊन गावातील शेतकरी गट, महिला बचत गट यांनी औवजारे बॅंक स्थापन करून गावाचा व शेतकऱ्यांचा विकास करावा असे आवाहन केले. कीटकशास्त्रज्ञ डवरे यांनी कपाशी- तूर पिकाचे उत्पादन घट येण्याची कारणे सांगून व्यवस्थापन इत्यादी विषयांवर सखोल मार्गदर्शन केले . यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेतीशाळा प्रशिक्षक मंगेश सुरजूसे यांनी केले तसेच उपस्थित अधिकारी वर्ग, शेतकरी, समूहातील होस्ट फार्मर, गेस्ट फार्मर, सदस्य, सरपंच, कृषी ताई यांचे आभार समूह सहाय्यक सावके यांनी मानले.