धनज येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:27 AM2021-07-21T04:27:28+5:302021-07-21T04:27:28+5:30

----------- मजुरांच्या कामाची देयके प्रलंबित वाशिम : सन २०१९ मध्ये रोजगार हमी योजनेंतर्गत शेकडो कामगारांना अद्याप मोबदला मिळाला नाही. ...

Guidance to farmers at Dhanaj | धनज येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन

धनज येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन

Next

-----------

मजुरांच्या कामाची देयके प्रलंबित

वाशिम : सन २०१९ मध्ये रोजगार हमी योजनेंतर्गत शेकडो कामगारांना अद्याप मोबदला मिळाला नाही. शेतकऱ्यांना कुशल कामाची देयकेही अद्याप मिळालेली नाहीत. याची दखल घेण्याची मागणी होत आहे.

----------

आसेगावात अनियमित वीजपुरवठा

वाशिम : मंगरुळपीर तालुक्यातील आसेगाव परिसरात आठवडाभरापासून विद्युत पुरवठ्यात वारंवार व्यत्यय निर्माण होत आहे. यामुळे भाजीपाला पिकांचे सिंचन प्रभावित होत असल्याने शेतकरी, तर घरातील पंखे बंद राहत असल्याने ग्रामस्थ हैराण झाले आहेत.

--------------

वाहनांवर कारवाईचा धडाका

वाशिम : वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या चालकांविरोधात वाहतूक पोलिसांची मोहीम सुरू आहे. याअंतर्गत सोमवारी रात्री उशिरापर्यंत वाशिम-पुसद मार्गावर वाहतूक पोलिसांनी वाहनांची कसून तपासणी करताना ४१ वाहनांवर कारवाई केली.

----------------

कामरगाव परिसरात रस्त्यावर सांडपाणी

वाशिम : कामरगाव ग्रामपंचायतकडून नाल्यांची सफाई होत नसल्याने सांडपाणी रस्त्यावर वाहत असून, ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे, तर महावितरणकडून अनियमित वीजपुरवठा होत असल्यानेही ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत.

-----------

Web Title: Guidance to farmers at Dhanaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.