चाऱ्याच्या पौष्टिकतेबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:46 AM2021-08-12T04:46:00+5:302021-08-12T04:46:00+5:30
कृषिमित्र अजय पांडुरंग राऊत यांनी चाऱ्यावर गूळ आणि मीठ प्रक्रियेचे होणारे फायदे शेतकऱ्यांना समजावून सांगितले. उन्हाळ्यात वाळलेल्या चाऱ्यामधून जनावरांना ...
कृषिमित्र अजय पांडुरंग राऊत यांनी चाऱ्यावर गूळ आणि मीठ प्रक्रियेचे होणारे फायदे शेतकऱ्यांना समजावून सांगितले. उन्हाळ्यात वाळलेल्या चाऱ्यामधून जनावरांना हवी तेवढी ऊर्जा मिळू शकत नाही. त्यामुळे जनावरांना अन्नद्रव्यांचा आभास होऊ लागतो. अशावेळी जनावरांच्या चाऱ्यावर गूळ आणि मीठाची प्रक्रिया केल्यास चाऱ्यामध्ये अन्नद्रव्यांचे प्रमाण वाढते, अशी माहिती राऊत यांनी दिली. या चाऱ्यामुळे जनावरांची पचनीयता वाढते. कमी चाऱ्यात जनावरांचे पोषण करता येते. यावेळी राजाराम राऊत, मनकर्णा राऊत, यादव तहकिक, ओम राऊत, सुनील मांगाडे, वैशाली राऊत आदी उपस्थित होते. या प्रात्यक्षिकासाठी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अतुल मुराई, कार्यक्रम अधिकारी प्रा. शशिकांत वाकुडकर व प्रा. आर. एस. डाखोरे यांचे मार्गदर्शन लाभले.
००००
अशी करावी चाऱ्यावर प्रक्रिया.
चाऱ्यावर गूळ आणि मीठाची प्रक्रिया करण्यासाठी १०० किलो चाऱ्यासाठी १ किलो गूळ, ५०० ते ७५० ग्रॅम मीठ हे २० ते २५ लीटर पाण्यात द्रावण तयार करून चाऱ्यावर सम प्रमाणात शिंपडावे. हा चारा १२ ते २४ तास झाकून ठेवून नंतर जनावरांच्या आहारात वापरावा. या प्रक्रियेमुळे चारा मऊ होतो, त्याची चव वाढते.