राष्ट्रीय मत्स्य दिनानिमित्त शेतकऱ्यांना मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:46 AM2021-07-14T04:46:12+5:302021-07-14T04:46:12+5:30

कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून अटारी पुणेचे संचालक डॉ. लाखनसिंग, तर अध्यक्षस्थानी सुविदे फांउडेशनचे विश्वस्त संजय उकळकर विराजमान होते. या कार्यक्रमास ...

Guidance to farmers on the occasion of National Fisheries Day | राष्ट्रीय मत्स्य दिनानिमित्त शेतकऱ्यांना मार्गदर्शन

राष्ट्रीय मत्स्य दिनानिमित्त शेतकऱ्यांना मार्गदर्शन

Next

कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून अटारी पुणेचे संचालक डॉ. लाखनसिंग, तर अध्यक्षस्थानी सुविदे फांउडेशनचे विश्वस्त संजय उकळकर विराजमान होते. या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व मत्स्य तज्ञ डॉ. आर. एल. काळे, तर विषय विशेषज्ञ एस. के. देशमुखही उपस्थित होते. एस. के. देशमुख यांनी मत्स्य संवर्धनात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन वाढविण्याचे आवाहन ग्रामीण युवकांना केले. तज्ञ मार्गदर्शक तथा मत्स्य तज्ञ डॉ. काळे यांनी मत्स्य संवर्धनाचे आधुनिक तंत्र व त्या माध्यमातून मत्स्य उत्पादनात वाढ, तसेच मत्स्य व्यवसायाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीबाबत तांत्रिक मार्गदर्शन केले. संजय उकळकर यांनी सद्य:स्थितीत आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने युवकांनी कृषिपूरक मत्स्य शेतीची कास धरावी, असे आवाहन केले. ऑनलाईन कार्यक्रमास मत्स्य पालक शेतकरी, ग्रामीण युवक व मत्स्य सेवा सहकारी सोसायटीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस. आर. बावस्कर, तर एस. के. देशमुख यांनी आभार मानले.

---------

शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविण्याचे आवाहन

डॉ. लाखनसिंग यांनी मत्स्य शेतीला चालना देण्याकरिता कृषी विज्ञान केंद्राच्या योगदानाबद्दल गौरवोद्गार काढून नील क्रांती घडवून आणण्यासाठी उपलब्ध जलाशय, तसेच मत्स्य तलावांचा पुरेपूर वापर करून मत्स्यपालक शेतकऱ्यांना मत्स्य प्रक्रिया, बाजारपेठ उपलब्धता व एकूणच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन केले.

Web Title: Guidance to farmers on the occasion of National Fisheries Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.