मृदा संवर्धनासंबंधी शेतकऱ्यांना मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:29 AM2021-05-31T04:29:37+5:302021-05-31T04:29:37+5:30
शेतकऱ्यांची उन्नती साधण्याकरिता समृद्ध गाव स्पर्धेच्या माध्यमातून सर्वंकष प्रयत्न केले जात आहेत. याअंतर्गत ग्रामीण भागात मृदा संवर्धन कसे करावे, ...
शेतकऱ्यांची उन्नती साधण्याकरिता समृद्ध गाव स्पर्धेच्या माध्यमातून सर्वंकष प्रयत्न केले जात आहेत. याअंतर्गत ग्रामीण भागात मृदा संवर्धन कसे करावे, त्याचे फायदे काय, याबाबत शेतकऱ्यांचे उद्बोधन करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा समन्वयक सुभाष नानवटे यांनी दिली.
..............
छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास जलाभिषेक
वाशिम : ‘३६५ दिवस शिवजलाभिषेक सोहळा’ या उपक्रमांतर्गत येथील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास मंगळवारी सकाळी जलाभिषेक करण्यात आला.
रक्तदानासाठी सदैव सज्ज राहणाऱ्या मोरया ब्लड डोनर ग्रुप या सामाजिक संघटनेशी जुळलेल्या युवकांनी १ जानेवारी २०२१ पासून वाशिम शहरातील शिवरायांच्या पुतळ्यास वर्षभर दैनंदिन जलाभिषक करण्याचा संकल्प केला आहे. त्यानुसार, दररोज पुढाकार घेतला जात असून रविवारी प्रवीण महाले यांच्याहस्ते जलाभिषेक करण्यात आला. यावेळी गोपाल एकाडे, राम व्यवहार उपस्थित होते.