वाडी रामराव येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:41 AM2021-02-24T04:41:57+5:302021-02-24T04:41:57+5:30
या वेळी उपविभागीय कृषी अधिकारी दत्तात्रय चौधरी, कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ तथा शेतीशाळा समन्वयक डॉ. राजेश डवरे, कृषी सहायक ...
या वेळी उपविभागीय कृषी अधिकारी दत्तात्रय चौधरी, कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ तथा शेतीशाळा समन्वयक डॉ. राजेश डवरे, कृषी सहायक प्रफुल चौधरी यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने शेती कशी करावी, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी प्रात्यक्षिक प्लॉट आणि पारंपरिक प्लॉटमधील फरक समजावून सांगण्यात आला. शेती शाळा समन्वयकांनी तंत्रज्ञानाचा लाभ शेतकऱ्यांना व्हावा याबाबत मार्गदर्शन केले. दत्तात्रय चौधरी यांनी पोकरा प्रकल्पांतर्गत शेतीशाळा व इतर तंत्रज्ञान घटकावर प्रकाश टाकला. या वेळी प्रशिक्षक म्हणून ज्ञानेश्वर तायडे, शिवाजी वाघ, अविनाश इंगळे, सुमीत सावळे, रवींद्र देवकर यांच्यासह शेतकऱ्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन घुगे यांनी तर आभार सुमित सावळे यांनी मानले.