इंझोरीत स्वच्छतेबाबत मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:43 AM2021-07-28T04:43:48+5:302021-07-28T04:43:48+5:30

----- मानोरा मार्गावर वाहनांची तपासणी चौसाळा : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर नियंत्रणासाठी कारंजा-मानोरा मार्गावर दुचाकी वाहनांची तपासणी पोलिसांकडून केली ...

Guidance on Injury Hygiene | इंझोरीत स्वच्छतेबाबत मार्गदर्शन

इंझोरीत स्वच्छतेबाबत मार्गदर्शन

Next

-----

मानोरा मार्गावर वाहनांची तपासणी

चौसाळा : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर नियंत्रणासाठी कारंजा-मानोरा मार्गावर दुचाकी वाहनांची तपासणी पोलिसांकडून केली जात आहे. याअंतर्गत सोमठाणा चेकपोस्ट पोलिसांनी वाहनांची कसून तपासणी मंगळवारी केली.

------

अनसिंग येथे पोलिसांची संख्या अपुरी

शिरपूर : जिल्ह्यातील मोठी ग्रामपंचायत असलेल्या अनसिंग येथील पोलीस स्टेशनअंतर्गत जनतेच्या सुरक्षेसाठी आवश्यक संख्येत पोलीस कर्मचारी नाहीत. त्यामुळे कार्यरत पोलीस कर्मचाऱ्यांवर कायदा-सुव्यवस्था अबाधित राखताना ताण येत आहे.

^^^^^^^^

हवामान यंत्राची दुरवस्था

आसेगाव : येथे चार वर्षांपूर्वी हवामानाच्या माहितीसाठी स्वयंचलित हवामान यंत्र स्थापित करण्यात आले; परंतु हे यंत्र नादुरुस्त झाले असून, याकडे संबंधित यंत्रणेचे दुर्लक्ष आहे. यामुळे शेतकऱ्यांना या यंत्रांचा काही एक फायदा होत नसल्याचे दिसत आहे.

----

ग्रामपंचायतकडून नाल्यांची साफसफाई

वाशिम : पावसाळ्याला सुरुवात झाली असल्याने गावात नाल्यांतील सांडपाण्यामुळे आरोग्याला असलेला धोका लक्षात घेत कारंजा तालुक्यात लोहगाव महागाव ग्रामपंचायतच्यावतीने सोमवारपासून नाल्यांची सफाई सुरू करण्यात आली आहे.

^^^^

पपई पिकावर रोगाचा प्रादुर्भाव

वाशिम : मंगरुळपीर तालुक्यात पपईच्या झाडांवर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. शेतकऱ्यांनी याबाबत काळजी घेऊन परिस्थिती गंभीर असल्यास कृषी विभागाचा सल्ला घ्यावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी रवींद्र इंगोले यांनी मंगळवारी केले.

^^^^^^^^^

नदीवरील बंधाऱ्याची दुरवस्था

वाशिम : मंगरुळपीर तालुक्यातील अरक, मानोलीदरम्यान वाहणाऱ्या मडाण नदीवर उभारलेल्या बंधाऱ्यांची दुरवस्था झाल्याने या नदीपात्रात पाणी थांबत नाही. त्यामुळे या बंधाऱ्यांची दुरुती करण्याची मागणी शेतकरी करीत आहे.

^^^^

आरोग्य केंद्राकडून ग्रामस्थांना मार्गदर्शन

वाशिम : आरोग्य पोषण व समुपदेशन कार्यक्रमांतर्गत वाशिम तालुक्यातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्यावतीने कोरोना संसर्गाच्या पृष्ठभूमीवर मंगळवारी गर्भवती व स्तनदा मातांसह ग्रामस्थांना आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले.

-------

Web Title: Guidance on Injury Hygiene

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.