भुईमुगावरील किड नियंत्रणाबाबत मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:49 AM2021-03-01T04:49:10+5:302021-03-01T04:49:10+5:30
---------- कृषी विभागातील २० पदे रिक्त वाशिम: जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयांतर्गत विविध संवर्गातील २० पदे रिक्त आहेत. त्यामुळे ...
----------
कृषी विभागातील २० पदे रिक्त
वाशिम: जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयांतर्गत विविध संवर्गातील २० पदे रिक्त आहेत. त्यामुळे विविध योजनांच्या अमलबजावणीवर परिणाम होत असून, कार्यरत कर्मचाºयांवर कामाचा अतिरिक्त ताण येत आहे.
----------------
तहसीलदारांकडून संचारबंदीचा आढावा
वाशिम: जिल्हाधिकाºयांनी शनिवारी सायंकाळपासून सोमवारपर्यंत जिल्ह्यात संचारबंदी लागू केली आहे. या संचारबंदीची अमलबजावणी कितपत होत आहे. याचा आढावा वाशिम तहसीलदारांनी रविवारी बाजारात फिरून घेतला.
--------------
कोविड केअर सेंटरची साफसफाई
वाशिम: वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे उपचारात अडचणी येऊ नयेत म्हणून बंद पडलेले कोविड सेंटर सुरू केले जात आहेत. त्यात वाशिम येथील मुलांच्या वसतीगृहात कोविड सेंटर सुरू करण्यात येत असून, येथे रविवारी साफसफाई करण्यात आली.
----------------------
पोहरादेवीत ४२ जणांची कोरोना चाचणी
पोहरादेवी: परिसरात दरदिवशी कोरोना रुग्ण आढळून येत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामस्थांची कोरोना चाचणी करण्याचे आदेश दिले आहेत. यात रविवारी ४२ लोकांची चाचणी करण्यात आली.