कौटुंबिक हिंसाचारापासून सरंक्षण कायद्याबाबत मार्गदर्शन; वाशिम येथे जिल्हास्तर कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2018 04:51 PM2018-02-02T16:51:30+5:302018-02-02T16:52:48+5:30
वाशिम: कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम २००५ बाबत जाणीव जागृती करण्याच्या उद्देशाने गुुरुवारी वाशिम येथील स्वागत लॉनमध्ये जिल्हास्तर कार्यशाळा घेण्यात आली.
वाशिम: कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम २००५ बाबत जाणीव जागृती करण्याच्या उद्देशाने गुुरुवारी वाशिम येथील स्वागत लॉनमध्ये जिल्हास्तर कार्यशाळा घेण्यात आली. जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालविकासाच्यावतीने आयोजित या कार्यक्रमात मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले.
कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण व्हावे, यासाठी तयार केलेल्या २००५च्या अधिनियमाबाबत जिल्हाभरात जाणीवजागृती करण्यात येत आहे. या अंतर्गत सदर कायद्याची व्यवस्थीत अंमलबजावणी व्हावी, कायद्यातील नियमांच्या तरतुदीची माहिती. या कायद्याच्या कार्यक्षेत्रातील अधिकारी, विधी सल्लागार, समुपदेशक पोलीस विभाग व स्वंयसेवी संस्थांचे प्रतिनिधींना व्हावी. बदल्या जीवनशैलीमुळे उद्भवणाºया वैवाहिक समस्यांचे निराकरण व्हावे, या उद्देशाने सदर कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुभाष राठोड यांनी करून या कार्यशाळेच्या आयोजनाचा उद्देश आणि महत्त्व उपस्थितांना पटवून दिले. कार्यक्र माच्या प्रमुख वक्त्यांनी कायद्याची निर्मिती व तरतुदीबाबत सखोल माहिती उपस्थितांना दिली. प्रमुख अतिथी यू. टी. मुसळे यांनी जीवन जगत असताना कौटुंबिक हिंसाचारापासून मुक्ती कशी करावी व जीवन आनंदमय मार्गाने कसे जगावे, याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन समुपदेशक अनिता काळे यांनी व आभार प्रदर्शन सरंक्षण अधिकारी अलोक अग्रहरी यांनी केले. कार्यक्रमासाठी विधी सल्लागार पराते, जिल्हा महिला व बालविकास विभागाच्या अधिकारी, कर्मचाºयांनी परीश्रम घेतले.