रांगडा कांद्याच्या शास्त्रोक्त लागवडीबाबत मार्गदर्शन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:26 AM2021-07-19T04:26:02+5:302021-07-19T04:26:02+5:30
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुविदे फाउंडेशनचे विश्वस्त संजय उकळकर, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून कृषिविद्यातज्ज्ञ निवृत्ती पाटील उपस्थित होते. तांत्रिक मार्गदर्शनात ...
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुविदे फाउंडेशनचे विश्वस्त संजय उकळकर, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून कृषिविद्यातज्ज्ञ निवृत्ती पाटील उपस्थित होते.
तांत्रिक मार्गदर्शनात निवृत्ती पाटील यांनी, कांदा हे भारतीय आहारातील महत्त्वाचे पीक असून फळे व भाजीपाला पिकांमध्ये सर्वात जास्त परदेशी चलन देणारे पीक असल्याचे स्पष्ट केले; परंतु इतर देशांच्या तुलनेत भारताची उत्पादकता खूप कमी असतानाच इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राचीही उत्पादकता कमी असल्याचे सांगतानाच यामागील महत्त्वाची कारणे व संभाव्य उपायांविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. संजय उकळकर यांनी शेतकऱ्यांनी बहुपीक पद्धतीचा अवलंब करून आपली आर्थिक परिस्थिती मजबूत करावी व त्यादृष्टीने अधिक बाजारभाव व जास्त नफा मिळविण्यासाठी शास्त्रशुद्ध पद्धतीने तिन्ही हंगामात कांदा उत्पादन घेण्याचे आवाहन केले.
--------------
शास्त्रोक्त लागवडीविषयक मार्गदर्शन
कृषिविद्यातज्ज्ञ निवृत्ती पाटील यांनी खरीप व रांगडा हंगामातील कांदा लागवडीतील बारकावे विशद करताना योग्य जमिनीची निवड, योग्य व शिफारशीत वाणांचा वापर, बीजप्रक्रिया व रोपवाटिका व्यवस्थापन, अन्नद्रव्य व ओळीत व्यवस्थापन आणि कीडरोग व्यवस्थापनाविषयी विस्तृत मार्गदर्शन केले. कांदा रोपवाटिका यशस्वी झाली म्हणजे निम्मी लढाई जिंकली असे समजले जाते. त्यामुळे उत्तम निचऱ्याच्या जमिनीत सेंद्रिय व रासायनिक खतांचा योग्य मात्रेत वापर करून एकात्मिक कीडरोग व्यवस्थापनाची जोड देण्याचे आवाहनही त्यांनी केले.
---------------