तंबाखूजन्य पदार्थांच्या दुष्परिणामासंदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 04:23 PM2018-12-21T16:23:54+5:302018-12-21T16:24:17+5:30
कारंजा लाड (वाशिम) : शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या सुचनेप्रमाणे शैक्षणिक संस्थेमध्ये तंबाखूजन्य पदार्थ्याच्या वापरावरील निर्बंधाबाबत शिक्षण संस्थाना शासनस्तराहून सूचना देण्यात आल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा लाड (वाशिम) : शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या सुचनेप्रमाणे शैक्षणिक संस्थेमध्ये तंबाखूजन्य पदार्थ्याच्या वापरावरील निर्बंधाबाबत शिक्षण संस्थाना शासनस्तराहून सूचना देण्यात आल्या. त्यानुसार जिल्हा परीषद शाळा काळी कारंजा बायपास येथील विद्यार्थ्यांना तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ्याच्या वापरावरील निर्बंधाबाबत माहिती तसेच व्यसनमुक्तीची शपथ दिली.
जिल्हा परीषद शाळा काळी कारंजा येथे पसरणी केंद्रप्रमुख सुर्यकांता खाडे यांच्या मार्गदर्शनाखली शाळेच्या मुख्याध्यापीका आशा हिंगनकर यांच्या मार्गदर्शनात शाळेतील पहिली ते सातवीच्या सर्व विद्यार्थ्यांना व शिक्षकांना शासनाच्या परीपत्रकाचे वाचन करून दाखविले. तंबाखू सेवनाने कोणते दुष्परीणाम होतात याबाबत माहिती दिली. जगात तंबाखू सेवनाने ५५ लाख लोकांचा मृत्यू होत असल्याची माहिती यावेळी मुख्याध्यापक हिंगणकर यांनी दिली. व्यसनमुक्तीची शपथ देतानाच, तंबाखूचे सेवन करू नये, प्रवृत्त करणा-या जाहीरातींना बळी पडू नये, जिवनाचा संयम टाळा अन तंबाखू खाणे टाळा अशी घोषणाबाजी करण्यात आली. रॅली काढून जनजागृती करण्यात आली. तंबाखूमुक्त समितीची सभा घेण्यात आली. या कार्यक्रमाला मुख्याध्यापिका आशा हिंगणकर, जयश्री कथले, प्रवेशा वाघमारे, डॉ गजानन ठाकरे, देविदास भगत, वर्षा महल्ले, जयश्री व्यवहारे, उज्वला शेंडे, भाग्यश्री तोंडकर, श्रीकांत देशपांडे, संगीता हळदे, प्रीतम पवार, तुप्ती बनसोडकर यांच्यासह शिक्षक व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे संचालन प्रवेशा वाघमारे यांनी केले.