गिरोली येथील कार्यशाळेत अंधश्रद्धेबाबत मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:35 AM2021-02-08T04:35:56+5:302021-02-08T04:35:56+5:30
अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हाध्यक्ष नीलेश मिसाळ, शे. इलियाज, सूचित देशमुख, शेख नुरू, गजाननराव देशमुख, इशाक शाह यांची ...
अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हाध्यक्ष नीलेश मिसाळ, शे. इलियाज, सूचित देशमुख, शेख नुरू, गजाननराव देशमुख, इशाक शाह यांची प्रमुख उपस्थिती होती. ‘वैज्ञानिक दृष्टिकोन आणि जादूटोणाविरोधी कायदा’ या विषयावर नीलेश मिसाळ यांनी व्याख्यान दिले. अंधश्रद्धा ही समाजाला लागलेली कीड आहे. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती १९८२ पासून अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करीत आहे. या समाजसेवी कार्यात प्रत्येकाने सहभागी व्हायला हवे. करणी, भानामती, जादूटोणाच्या नावाखाली बुवा-बाबा, मांत्रिक लोकांची लुबाडणूक करतात. त्यास जनतेने बळी पडू नये. कायद्याच्या माध्यमातून समाजातील अंधश्रद्धा, वाईट चालीरीती, अघोरी प्रथेस अटकाव बसला आहे. महाराष्ट्र शासनाचा जादूटोणाविरोधी कायदा हा क्रांतिकारी कायदा असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यशाळेला गावातील नागरिक, विद्यार्थी, युवक उपस्थित होते. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य यू.एस. जमधाडे, क्षेत्रकार्य समन्वयक डी.एस. गोरे, क्षेत्रकार्य मार्गदर्शक प्रा. यू.ए. घुगे, युवराज राठोड आदींनी पुढाकार घेतला.