इनरव्हीलकडून किशोरवयीन विद्यार्थींनीना मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2017 01:30 PM2017-10-04T13:30:49+5:302017-10-04T13:30:58+5:30

Guidance by teenage students from underworld | इनरव्हीलकडून किशोरवयीन विद्यार्थींनीना मार्गदर्शन

इनरव्हीलकडून किशोरवयीन विद्यार्थींनीना मार्गदर्शन

Next

वाशिम: इनरव्हील क्लबच्यावतीने शुक्रवारी किशोरवयीन मुलींमध्ये वयोमानाने होणारे शारिरीक बदल जागृतीपर मार्गदर्शन उपक्रम राबविण्यात आला.

 इनरव्हील या स्वयंसेवी संस्थेच्यावतीने शहरातील विविध शाळांमधील इयत्ता आठवी , नववी, दहावी  तसेच महाविद्यालयीन , विद्यार्थीनीना  वाढत्या वयानुसार शारिरातील होणारे बदल  याबाबत मार्गदर्शन करण्यात येऊन त्यावर योग्य उपाय बाबतची माहिती देण्यात आली.  शहरातील सुशिलाबाई जाधव शाळा, परमवीर अब्दुल हमीद उर्दू स्कूल, रेखाताई राष्ट्रीय कन्या विद्यालय, समर्थ गजानन स्कुल, मौलाना आझाद उर्दू स्कुल आदि शाळांमध्ये सदर मार्गदर्शन उपक्रम राबविण्यात आला तसेच विद्यार्थीनीशी संवाद साधण्यात आला. इनरव्हीलच्या अध्यक्षा संध्या राठोड व सचिव हेमा विसपुते  यांच्या नेतृत्वात  प्रा.डॉ.मंजुश्री जांभरुणकर ,प्रा.शुभांगी दामले,  प्रा.डॉ.मेघा देशमुख,  कल्याणी बैस, साधना नेनवाणी, मंगल शिंदे आदि पदाधिकाºयांनी यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

Web Title: Guidance by teenage students from underworld

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.