पोहा येथे कृषी संजीवनी मोहिमेंतर्गत मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:28 AM2021-06-26T04:28:15+5:302021-06-26T04:28:15+5:30
पोहा येथे आयोजित कार्यक्रमात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी तयार केलेल्या अष्टसूत्रीचा अवलंब करणे या विषयावर कृषी ...
पोहा येथे आयोजित कार्यक्रमात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी तयार केलेल्या अष्टसूत्रीचा अवलंब करणे या विषयावर कृषी पर्यवेक्षक सुनील शिंदे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. कृषी साहाय्यक चंदन राठोड यांनी फळबाग लागवड माहिती, विकेल ते पिकेल संकल्पना, कीड व रोगाबद्दल माहिती व कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती व सविस्तर मार्गदर्शन केले. शिवार फेरीदरम्यान अशोक पाटील दहातोंडे यांच्या शेतात टोकण पद्धतीने सोयाबीन लागवडीची उपस्थित शेतकऱ्यांनी पाहणी केली. स्मार्ट कॉटन प्रकल्पांंतर्गत 'एक गाव - एक वाण' कृषी विभाग व आत्मा यांच्या संयुक्तपणे राबविण्यात येत आहे. यासाठी शेतकऱ्यांना तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक रामेश्वर पाटील यांनी एकात्मिक कीड नियंत्रण, लिंबोळी अर्क व दशपर्णी अर्क कसे तयार करायचे व त्यांचा योग्य वापर एकात्मिक कीड व्यवस्थापन करण्याचे मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला.