समृद्ध गाव स्पर्धेंतर्गत मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:35 AM2021-01-17T04:35:39+5:302021-01-17T04:35:39+5:30
--------- पिंप्री मोडक येथील दोघांना कोरोना कामरगाव: कारंजा तालुक्यातील पिंप्री मोडक येथील दोन व्यक्तींना कोरोना संसर्ग असल्याचे आरोग्य विभागाकडून ...
---------
पिंप्री मोडक येथील दोघांना कोरोना
कामरगाव: कारंजा तालुक्यातील पिंप्री मोडक येथील दोन व्यक्तींना कोरोना संसर्ग असल्याचे आरोग्य विभागाकडून शनिवारी प्राप्त अहवालावरून स्पष्ट झाले आहे. दोन्ही कोरोना बाधित रुग्णांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले असून, आरोग्य विभागाने त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचीही कोरोना चाचणी केली आहे.
----
विठोली येथील एक बाधित
पोहरादेवी: मानोरा तालुक्यात पुन्हा कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढू लागला असून, गुरुवारी तालुक्यातील पाच जण बाधित आढळल्यानंतर शनिवारी आणखी दोघांना कोरोना संसर्ग असल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे. त्यात विठोली येथील एका व्यक्तीसह कुपटा येथील एका व्यक्तीचा समावेश आहे.
-------
रुग्णालयांची तपासणी मोहीम
वाशिम: जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील सर्व रुग्णालयांची तपासणी करण्यासाठी मोहीम राबवावी. त्याआधारे रुग्णालयांमधील अग्निशमन यंत्रणेसह इतर बाबींची उपलब्धता याविषयीचा वस्तुनिष्ठ अहवाल सादर करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी १२ जानेवारी रोजी दिल्यानंतर जिल्ह्यातील रुग्णालयांची तपासणी सुरू करण्यात आली आहे.
-------
इंझोरी येथे घरोघरी आरोग्य तपासणी
इंझोरी : इंझोरी येथे आरोग्य विभागाकडून घरोघरी फिरून ग्रामस्थांची तपासणी केली जात आहे. या अंतर्गत शुक्रवारी अनेक ग्रामस्थांची तपासणी करण्यात आली. अंगणवाडीसेविका, आरोग्य सेविकेकडून माहितीही घेण्यात आली असून, ग्रामस्थांनी दक्षता घेण्याचे आवाहनही वैद्यकीय अधिकारी डॉ. सुधीर खिराडे यांनी केले