पोहा येथे अतिसार नियंत्रणाबाबत ग्रामस्थांना मार्गदर्शन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 01:25 PM2018-05-29T13:25:08+5:302018-05-29T13:25:08+5:30

पोहा: आरोग्य विभाग वाशिमच्यावतीने कारंजा तालुक्यातील पोहा येथे अतिसार नियंत्रण पंधरवाडा मोहिमेला प्रारंभ करण्यात आला.

Guidance to the villagers about the control of diarrhea at Poha | पोहा येथे अतिसार नियंत्रणाबाबत ग्रामस्थांना मार्गदर्शन 

पोहा येथे अतिसार नियंत्रणाबाबत ग्रामस्थांना मार्गदर्शन 

Next
ठळक मुद्दे ही मोहिम ९ जून २०१८ पर्यंत चालणार असून, या अंतर्गत ग्रामस्थांना अतिसार नियंत्रणाबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत आशास्वंयसेविका घरोघरी भेटी देऊन रुग्णांना सेवा देणार आहेत.अतिसारामुळे होणारे बालमृत्यू शुन्य करणे हे उद्दिष्ट समोर ठेऊन अतिसार नियंत्रण पंधरवाडा राबविण्यात येत आहे.

पोहा: आरोग्य विभाग वाशिमच्यावतीने कारंजा तालुक्यातील पोहा येथे अतिसार नियंत्रण पंधरवाडा मोहिमेला प्रारंभ करण्यात आला. ही मोहिम ९ जून २०१८ पर्यंत चालणार असून, या अंतर्गत ग्रामस्थांना अतिसार नियंत्रणाबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. सरपंच डॉ. शरदराव दहातोंडे सरपंच पोहा यांचे या मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले.
अतिसार पंधरवडा मोहिमेंतर्गत अतिसार हा आजार दुषित पाण्यामुळे आजार होत असून, या आजारापासून बचावासाठी निर्जंतुकीकरण केलेले पाणी पिणे, शिळे अन्न, सडकी फळे, मेवामिठाई खाऊ नये, अशी माहिती ग्रामस्थांना सरपंच डॉ. शरदराव दहातोंडे यांनी दिली, तसेच उपचारापेक्षा प्रतिबंध केंव्हाही बरा, वैयक्तिक व परिसर स्वच्छता परिसर  ठेवणे प्रय्येकाचे कर्तव्य असल्याचेही त्यांनी सांगितले. या मोहिमेंतर्गत आशास्वंयसेविका घरोघरी भेटी देऊन रुग्णांना सेवा देणार आहेत. आरोग्य सेविका एम.एम. बुधनेर यांनी यावेळी अतिसाराच्या गंभीरतेबाबत माहिती देताना सांगितले की, देशात ५ वर्षापर्यतच्या बालकांच्या मृत्युमागे अतिसार हे प्रमुख कारण असून, १० टक्के बालके अतिसारामुळे दगावतात. अतिसारामुळे होणारे बालमृत्यू शुन्य करणे हे उद्दिष्ट समोर ठेऊन अतिसार नियंत्रण पंधरवाडा राबविण्यात येत आहे. कविता भास्करराव दहातोंडे म्हणाल्या की, या मोहिमेंंतर्गत आशासेविका गृहभेटी देऊन सर्वेक्षण करणार असून, क्षारसंजीवनी पाकिटाचे वाटप या अंतर्गत करण्यास गटसभा घेऊन ओआरएस द्रावण तयार करणे, हातधुण्याच्या पद्धती, आजाराची लक्षणे दिसलेल्या बालकास ओआरएस व झींक गोळ्या देऊन ऊपचार करणे, धोक्याच्या लक्षणाची गंभीरता वेळीच ओळखून संदर्भ सेवा देणे, आदि कार्य त्यांच्यावतीने करण्यात येणार आहेत. कार्यक्रमाला आशासेविका शिला दहातोंडे, योगिता जाधव व गावातील महिला, पुरुष मंडळी बहुसंख्येने उपस्थित होती. कार्यक्रमाचे संचालन आरोग्य सेवक ए.जी.सोनोने यांनी केले.

Web Title: Guidance to the villagers about the control of diarrhea at Poha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :washimवाशिम