स्तनपानसंदर्भात महिलांना मार्गदर्शन !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2020 05:32 PM2020-08-03T17:32:23+5:302020-08-03T17:32:48+5:30
महिलांमध्ये जनजागृती करण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयातर्फे आहार तज्ज्ञ डॉ. सुनिता लाहोरे यांनी सोमवारी महिलांना मार्गदर्शन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त वाशिम येथे ३ आॅगस्ट रोजी जनजागृतीपर कार्यक्रम घेऊन स्तनपानसंदर्भात जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आहार तज्ज्ञ डॉ. सुनिता लाहोरे यांनी महिलांना मार्गदर्शन केले.
दरवर्षी आॅगस्ट महिन्यात पहिल्या आठवड्यात स्तनपान सप्ताह साजरा केला जातो. स्तनपानसंदर्भात महिलांमध्ये जनजागृती करण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयातर्फे आहार तज्ज्ञ डॉ. सुनिता लाहोरे यांनी सोमवारी महिलांना मार्गदर्शन केले. माता आणि बाळाच्या आरोग्यासाठी स्तनपानाला अनन्यसाधारण महत्व असून, मातांनी शक्यतोवर स्तनपान टाळू नये, असे आवाहन त्यांनी केले. अंगावर दूध पाजल्याने स्त्रियांना, मातांमध्ये स्तनाच्या गर्भाशयाच्या व अंडाशयाच्या कर्करोगाचा धोका कमी होतो तसेच गरोदरपणात वाढलेले वजन कमी होण्यास मदत होते; यासोबतीला योग्य व्यायाम घेणे व आहारात स्निग्ध पदार्थ योग्य प्रमाणात घेणे आवश्यक असते. प्रसुतीनंतर होणारा अतिरिक्त, जास्तीचा रक्तस्त्राव कमी होण्यास मदत होते. उतारवयातील हाडांच्या ढिसुळपणापासूनही संरक्षण होते. स्तनपान सुलभ असल्यामुळे त्यासाठी कोणत्याही पुर्वतयारीची आवश्यकता नसते, असे डॉ. लाहोरे यांनी सांगितले. यावेळी महिलांची उपस्थिती होती.
स्तनपानमुळे बाळांना मिळणारे फायदे
- आईचे दूध पचायला सोप असते, आईच्या दुधाचे तापमान योग्य असते.
- आईचे दूध निजंर्तुक असते, कारण ते आईच्या स्तनातून सरळ बाळाला मिळते.
- आईचे दूध जिवतं असल्याने त्यात रोगप्रतिकारक शक्ती असते. त्यामुळे न्यूमोनिया,जुलाब व इतर संसर्गजन्य आजारांपासून संरक्षण मिळते.
- आईच्या दुधावर वाढणाºया मुलांची बौध्दिक व मानसिक क्षमता
- जास्त असते, दमा व अॅलर्जीपासून सरंक्षण मिळते.
- भावी आयुष्यात स्थूलता, रक्तदाब, हदयविकार, मधुमेह या
- आजारांपासून सरंक्षण मिळते.
- आई व बाळाचे भावनिक, प्रेमाचे नाते अधिक मजबूत होते.