समृद्ध गाव स्पर्धेंतर्गत महिला बचत गटांना मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:40 AM2021-02-10T04:40:27+5:302021-02-10T04:40:27+5:30
मंगरूळपीर तालुक्यातील पिंपळखुटा येथे महिला बचत गटांना मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी भेट दिली. यावेळी ...
मंगरूळपीर तालुक्यातील पिंपळखुटा येथे महिला बचत गटांना मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी भेट दिली. यावेळी बचत गटाच्या अध्यक्ष) वर्षा पडघान आणि मोडले यांचा सत्कारही त्यांनी केला. या कार्यक्रमात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी समृद्ध गाव स्पर्धेत महिला बचत गटांचा सहभाग किती महत्त्वाचा आहे, हे पटवून देतानाच त्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले. त्यात हंगामनिहाय पीक सर्वेक्षण, कूपनलिका, विहिरीच्या पातळीची मोजणी, याबाबत महिला बचत गट करीत असलेल्या कार्याची स्तुतीही त्यांनी केली. यावेळी पाणी फाउंडेशनचे जिल्हा समन्वयक सुभाष नानवटे यांची उपस्थिती होती. दरम्यान, समृद्ध गाव स्पर्धेसाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी तयार केलेल्या कृती आराखड्याची प्रत महिला बचत गटाला देण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुदर्शन धोटे यांनी केले. यावेळी ग्रामसेवक, सरपंच, पोलीस पाटील, मुख्याध्यापक, कृषी सहायक व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होती.
----------
शिवण बु. येथे जनजागृती
कारंजा तालुक्यातील शिवण बु. येथेही कृषी विभागाकडून महिला बचत गटांना मार्गदर्शन करण्यात आले. यानुसार बचत गट निर्माण करणे, पाण्याचा जपून वापर करणे, स्वछता ठेवणे, सार्वजनिक कार्यक्रमांत महिलांनी सहभागी होणे, प्रति कुटुंब एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याबाबत महिला जनजागृती करीत आहेत.