हिवरा रोहिला येथे मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:25 AM2021-07-19T04:25:57+5:302021-07-19T04:25:57+5:30
^^^^^^ प्रवासी निवाऱ्यांचा कामगारांना आधार वाशिम : जिल्ह्यातील सर्वच राष्ट्रीय महामार्गांलगत विविध गावांच्या रस्त्यांवर प्रवाशांसाठी निवारे उभारण्यात आले आहेत. ...
^^^^^^
प्रवासी निवाऱ्यांचा कामगारांना आधार
वाशिम : जिल्ह्यातील सर्वच राष्ट्रीय महामार्गांलगत विविध गावांच्या रस्त्यांवर प्रवाशांसाठी निवारे उभारण्यात आले आहेत. सद्य:स्थितीत शेतीसह महावितरणची वीजवाहिनी जोडणारे, पेरणी यंत्र, ट्रॅक्टर चालविणारे कामगार यांना हे प्रवासी निवारे आधार देत आहेत.
----------
कामरगावातील नाल्या सफाईची मागणी
वाशिम : कारंजा तालुक्यातील सर्वांत मोठी ग्रामपंचायत असलेल्या कामरगाव येथे महिनाभरापासून नाल्यांची सफाई करण्यात आली नाही. त्यामुळे सांडपाणी रस्त्यावर वाहत असल्याने आरोग्याला धोका आहे. ग्रामपंचायतने नाल्यांची सफाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी शुक्रवारी केली.
---------
पावसामुळे क्षतिग्रस्त पूल जैसे-थे
वाशिम : काजळेश्वर ते पानगव्हाण मार्गावरील पानगव्हाण गावानजीकच्या नाल्यावर असलेला पूल गतवर्षी मुसळधार पावसाने आलेल्या पुरामुळे वाहून गेला. यामुळे वाहतुकीवर परिणाम होत असताना अद्यापही या पुलाचे काम करण्यात आले नाही.
------------
रस्त्यावरील पूल धोकादायक
वाशिम : रिसोड तालुक्यातील रिसोड ते गोभणी या दोन गावांदरम्यान असलेल्या रस्त्यात पैनगंगा नदीपात्रात पुलाची उभारणी काही वर्षांपूर्वी करण्यात आली. या पुलाची उंची कमी असून, पुलावरून पाणी वाहते. त्यामुळे एखादवेळी येथे अपघात घडण्याची भीती आहे.
-----
खंडित वीजपुरवठ्याला ग्रामस्थ वैतागले
वाशिम : कारंजा तालुक्यातील धोत्रा देशमुख येथे गेल्या अनेक दिवसांपासून वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने येथील गावकरी वैतागले आहेत. ही समस्या सोडविण्यासाठी गावकऱ्यांनी महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्यांना निवेदन देऊनही समस्या कायम आहे.
---------