उन्नत शेती समृद्ध शेतकरी अंतर्गत दगड उमरा येथे मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 06:50 PM2018-05-30T18:50:30+5:302018-05-30T18:50:30+5:30
दगड उमरा : वाशिम तालुक्यातील दगड उमरा येथील हनुमान मंदिरावर उन्नत शेती समृद्धी शेतकरी कार्यक्रमांतर्गत शेतकरी मार्गदर्शन सभेचे आयोजन मंगळवार ३० मे रोजी करण्यात आले होते.
दगड उमरा : वाशिम तालुक्यातील दगड उमरा येथील हनुमान मंदिरावर उन्नत शेती समृद्धी शेतकरी कार्यक्रमांतर्गत शेतकरी मार्गदर्शन सभेचे आयोजन ३० मे रोजी करण्यात आले होते. या कार्यक्रमात आगामी खरीप हंगामाच्या पृष्ठभूमीवर शेतकºयांना विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यासह शासकीय योजनांची माहिती देऊन त्याचा लाभ घेण्याचे आवाहन कृषी सहाय्यकांनी केले.
उन्नत शेती समृद्ध शेतकरी या कार्यक्रमांतर्गत आयोजित सभेत कृषी योजनांची जनजागृती, जलयुक्त शिवार, महात्मा गांधी रोजगार हमी अंतर्गत फळबाग, १३ कोटी रुक्ष लागवड, मातीपरीक्षण,रासायनिक खताचा समतोल वापर, शेतमालावर प्रक्रिया, उद्योग वाढविण्याचे तंत्र अवलंबवने, बीज प्रक्रिया करणे, पिकांचा फेरपालट करणे, आदि माहिती कृषी सहायक खोलगडे यांनी दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपसरपंच जनार्धन पाठे हे होते. या कार्यक्रमाला गावाील बहुसंख्य शेतकºयांची उपस्थिती लाभली होती.