गुजरातमधील ट्रकचालकाचा वाशिम जिल्ह्यात मृत्यू; कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2020 10:05 AM2020-05-04T10:05:40+5:302020-05-04T10:09:11+5:30

पेट्रोल पंपानजीक एका ट्रक चालकाचा ३ मे रोजी अचानक मृत्यू झाला होता.

Gujarat truck driver dies in Washim district; Corona report positive | गुजरातमधील ट्रकचालकाचा वाशिम जिल्ह्यात मृत्यू; कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

गुजरातमधील ट्रकचालकाचा वाशिम जिल्ह्यात मृत्यू; कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

Next
ठळक मुद्देट्रक चालक हा गुजरात राज्यातील रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे.त्याच्या संपर्कात आलेल्या तीन जणांना आयसोलेशन कक्षात दाखल केले आहे. त्यांचे थ्रोट स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत.

वाशिम : शिरपूर जैन पोलीस स्टेशनच्या हद्दीत मेहकर ते मालेगाव रस्त्यावरील कुकसा येथील पेट्रोल पंपानजीक एका ट्रक चालकाचा ३ मे रोजी अचानक मृत्यू झाला होता. त्याचा थ्रोट स्वॅब नमुना तपासणीसाठी ३ मे रोजी अकोला येथे पाठविण्यात आला. त्याचा अहवाल ४ मे रोजी सकाळी प्राप्त झाला असून, हा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सदर ट्रक चालक हा गुजरात राज्यातील रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे. त्याच्या संपर्कात आलेल्या तीन जणांना आयसोलेशन कक्षात दाखल केले असून, त्यांचे थ्रोट स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत. सदर मृतक ट्रक चालक मुंबईहून नागपुकडे जात होता. त्याचा ट्रक २ मे रोजी रात्री नादुरुस्त झाला होता. तो २ मे चा रात्री येथील पेट्रोल पंप परिसरात मुक्कामी होता. तेथे त्याने डिझेल सुद्धा भरले. कुकसा येथे सदर ट्रक चालक हा पंपावर काम करणा?्या दोघांच्या संपर्कात आल्याची प्राथमिक माहिती आहे. या ट्रकचालकास सोबत एक क्लिनर सुद्धा होता.

 

Web Title: Gujarat truck driver dies in Washim district; Corona report positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.