गुजरातमधील माठ वाशिम शहरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 03:50 PM2019-03-26T15:50:57+5:302019-03-26T15:51:07+5:30
वाशिम: रखरखत्या उन्हाळ्यात घशाची कोरड मिटविण्याच्या उद्देशाने लोक माठांची खरेदी करीत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: रखरखत्या उन्हाळ्यात घशाची कोरड मिटविण्याच्या उद्देशाने लोक माठांची खरेदी करीत आहेत. जनतेची माठांची मागणी लक्षात घेऊन काही व्यावसायिकांनी थेट गुजरात राज्यातील माठ वाशिम शहरात आणले असून, साधारण माठांपेक्षा आकर्षक आणि उपयुक्त ठरणाºया या माठांना नागरिकांची मोठी मागणी आहे.
उन्हाचा पारा दिवसेंदिवस चढत असल्याने घशाची कोरड मिटविण्यासाठी सर्वसाधारण लोक थंडपाणी पिण्यासाठी माठांचा वापर करीत आहेत. नागरिकांची ही गरज लक्षात घेऊन कुंभकार बांधवांनी वाशिम शहरच नव्हे, तर जिल्ह्यातील प्रत्येक शहरात माठांची विक्री सुरू केली आहे. स्थानिक कुंभकार बांधवांनी आपल्या परीने आकार, रंगांचे माठ बाजारात उपलब्ध केले आहेत. या माठांची विक्रीही चांगली होत आहे. फ्रिजचे थंडपाणी पिण्याऐवजी नैसर्गिकरित्या गार होणाºया पाण्यासाठी लोक माठांना पसंती देत आहेत. हीच बाब लक्षात घेऊन काही व्यवसायिकांनी थेट गुजरातमधील राजकोट येथे घडविलेले लाल रंगांचे आकर्षक माठ वाशिम शहरात आणले आहेत. साधारण २० लीटर पाणी साठविण्याची क्षमता असलेल्या या माठात पाणी लवकर गार होत असल्याचे व्यावसायिकांचे म्हणने असून, या माठांना मोठ्या प्रमाणात मागणी असल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्रातील पारंपरिक माठांपेक्षा वेगळे असलेले हे माठ नागरिकांचे लक्ष वेधत आहेत.