गुरुदेव क्रांतीज्योत यात्रा १३ आॅगस्टला वाशिममध्ये
By admin | Published: August 7, 2015 01:17 AM2015-08-07T01:17:22+5:302015-08-07T01:17:22+5:30
साखरडोह येथे सामुदायीक ध्यान व स्वागत कर्यक्रम.
मंगरुळपीर(जि. वाशिम): अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज आश्रम मोझरी मार्फत शहीदांच्या स्मृती प्रित्यर्थ निघणारी गुरुदेव क्रांतीज्योत यात्रा ९ आॅगस्ट २०१५ रोजी सकाळी ८ वाजता प्रस्थान होवून गावोगावी भेट देत १३ आॅगस्ट रोजी वाशिम जिल्ह्यात येणार आहे. १३ आॅगस्ट रोजी सकाळी ९ वाजता रिसोड येथे स्वागत कार्यक्रम ११ वाजता ,वारा जहॉगीर येथे भेट, दुपारी मंगरुथनाथ मार्र्गे पारवा येथे ध्यान व स्वागत कार्यक्रम ४ वाजता मानोरा मार्गे साखरडोह येथे सामुदायीक ध्यान व स्वागत कर्यक्रम संध्याकाळी ६ वाजता दिग्रस येथे सवागत, सामुदायीक प्रार्थना व मुक्काम. तसेच दुसरे दिवशी सकाळी ७ वाजता पुढील प्रवासाकरिता ही श्री गुरुदेव क्रांती ज्योतयात्रा प्रस्थान कराणर आहे. श्री गुरुदेव क्रांतीज्योत यात्रा भारतातील शहिदांच्या स्मृती प्रित्यर्थ काढण्यात येत असून अमरावती जिल्हा, अकोला जिल्हा, बुलडाणा जिल्हा, वाशीम जिल्हा, यवतमाळ जिल्हा, आष्टी शहीद, नागपूर जिल्हा, तुमसर जिल्हा, गोंदीया जिल्हा, गडचिरोली जिल्हा, चंद्रपुर जिल्हा, वर्धा जिल्हा, आदि जिल्ह्यातील सर्व श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या शाखांना भेट व मार्गदर्शन करणार आहे. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात हजारो लोकांनी प्राणाची आहूती दिली. फासावर गेले. हुतात्म्याच्या बलीदानातून १५ आॅगस्ट १९४७ रोजी भारत देश स्वातंत्र्य झाला. परंतु एकुण वातावरण पाहता हुतात्म्याच्या त्यागाचा विसर पडला आहे. राष्ट्रीय भावना जागृत करण्याच्य उद्देशाने श्री गुरुदेव क्रांतीज्योत यात्रा आयोजित करण्यात आली आहे. तरी या क्रांती ज्योत यात्रेच्या दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे वाशीम जिल्हा सेवाधिकारी दादाराव पाथ्रीकर, जिल्हा प्रचारक साहेबराव पाटील, मंगरुथनाथ तालुका सेवाधिकारी शिवदास सुर्य पाटील, तालुका प्रचारक डॉ.सुधाकर क्षिरसागर, जीवन प्रचारक रविंद्र वार्डेकर आदिंनी केले आहे.