gurupurnima: गुरु बंधन उपक्रम राबवून जोपासली गुरु-शिष्य परंपरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 02:26 PM2018-07-27T14:26:40+5:302018-07-27T14:28:10+5:30
मंगरुळपीर: शहरालगतच असलेल्या शहापूर येथील जॉयफुल लर्नर्स स्कूलने गुुरुपौर्णिमेच्या पावन पर्वावर गुरु बंधन उपक्रम राबवून परंपरेचे दर्शन घडविले.
उत्सवाचे आयोजन: विद्यार्थ्यांना गुरु बंधन
लोकमत न्यूज नेटवर्क
मंगरुळपीर: शहरालगतच असलेल्या शहापूर येथील जॉयफुल लर्नर्स स्कूलने गुुरुपौर्णिमेच्या पावन पर्वावर गुरु बंधन उपक्रम राबवून परंपरेचे दर्शन घडविले. या उत्सवात शाळेतील चिमुकले विद्यार्थी आणि शिक्षिका उत्साहात सहभागी झाल्या होत्या.
संस्थेच्या संचालिका चंचल खिराडे यांच्या अध्यक्षतेखाली आणि त्यांच्याच संकल्पनेतून गुरुपौर्णिमा उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सुनिता घाटे यांची उपस्थिती होती. गुरुपौर्णिमेच्या पावनपर्वावर एकलव्य, गुरु द्रोणाचार्य यांची कथा विद्यार्थ्यांना संचालिका चंचल खिराडे यांनी सांगितली, तसेच गुरुचे विद्यार्थ्याच्या जीवनातील महत्त्व पटवून दिले. यावेळी विद्यार्थ्यांनी गुरुविषयी आदर दर्शविणाºया प्रतिक्रिया व्यक्त करतानाच कठोर परिश्रम घेऊन यश मिळविण्याची प्रतिज्ञाही घेतली. यावेळी शिक्षिकांनी सर्व विद्यार्थ्यांना गुरु बंधन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चंचल खिराडे, सोनल पाटील, मनिषा सोनोने, प्रगमी तिडके, दिपाली जाधव, विद्या झांबरे, गजानन पाबळे, उद्धव राऊत यांनी परिश्रम घेतले.