बंदी असूनही गुटखा विक्री सर्रास सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:47 AM2021-08-12T04:47:15+5:302021-08-12T04:47:15+5:30

ग्रामीण परिसरात प्रत्येक खेड्यात किराणा दुकान, पानठेला इत्यादी ठिकाणी गुटख्याच्या पुड्या विक्रीसाठी लटकवलेल्या आढळून येत आहेत. कोणाचीही भीती न ...

Gutka sales continue to be rampant despite the ban | बंदी असूनही गुटखा विक्री सर्रास सुरूच

बंदी असूनही गुटखा विक्री सर्रास सुरूच

Next

ग्रामीण परिसरात प्रत्येक खेड्यात किराणा दुकान, पानठेला इत्यादी ठिकाणी गुटख्याच्या पुड्या विक्रीसाठी लटकवलेल्या आढळून येत आहेत. कोणाचीही भीती न बाळगता गुटख्याची खुलेआम विक्री सुरू आहे. होलसेल गुटका विक्रेते हे सर्व खेड्यात व गावात प्रत्येक दुकानावर गुटख्याचा माल मोटारसायकलवरून पोहोचून देण्याचे काम करीत असल्याचे चित्र आहे. मात्र त्यांच्यावर कोणतीच कारवाई होताना दिसून येत नसल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. महिला, पुरुष तथा शालेय विद्यार्थीसुद्धा मोठ्या प्रमाणात या गुटख्याच्या आहारी गेले आहेत. कर्करोगाचा वाढता धोका लक्षात घेता महाराष्ट्र शासनाने धाडसी निर्णय घेत राज्यात गुटखा बंदीचा निर्णय घेतला होता. कठोर अंमलबजावणीसाठी कायदासुद्धा निर्माण केला आहे; परंतु अन्न व औषध प्रशासन विभाग आणि पोलीस प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याचे दिसत आहे . दुर्लक्षामुळे गुटखा विक्री जोमात सुरू आहे. कारवाईत गुटख्याच्या पुड्या जप्त करण्यात आल्याचे दिसत असले तरी थातूरमातूर कारवाईनंतर पुन्हा गुटखा विक्रीकडे दुर्लक्ष होत आहे.

.................

केवळ किरकाेळ विक्रेत्यांवर कारवाई

गत महिन्यात शहरात पानटपऱ्यांवर गुटखा विक्री करणाऱ्या किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. तसेच गुन्हेही दाखल करण्यात आले. मात्र घाऊक विक्रेते मात्र मोकटच असून लाखो, करोडो रुपयांची उलाढाल करणाऱ्यांवर कारवाई होणे आवश्यक आहे.

Web Title: Gutka sales continue to be rampant despite the ban

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.