१.७४ लाखांचा गुटखा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:46 AM2021-05-25T04:46:46+5:302021-05-25T04:46:46+5:30
पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांना गोपनीय माहिती मिळाली की, रिसोड तालुक्यातील वाडी रोडवरील श्री गजानन महाराज मूकबधिर विद्यालय ...
पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांना गोपनीय माहिती मिळाली की, रिसोड तालुक्यातील वाडी रोडवरील श्री गजानन महाराज मूकबधिर विद्यालय मोरगव्हाण येथील दोन खोल्यांमध्ये अवैधरित्या गुटखा विक्रीकरीता साठवून ठेवला आहे. सदरची माहिती पोलीस अधीक्षकांनी पोलीस निरीक्षक शिवाजी ठाकरे यांना देऊन तत्काळ कायदेशीर कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. शिवा ठाकरे यांनी क्षणाचाही विलंब न करता २.३० वा चे सुमारास पथकातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी विद्यालय येथे छापा मारला असता शाळेचे मनोरंजन व संगणक कक्षाचे खोलीमध्ये अवैधरित्या महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला सुगंधीत तंबाखू एकूण किमत १,७४,००० रुपये किमतीचा १९ पोते व ५ पृष्ठाचे बॉक्समध्ये अवैधरित्या विक्रीकरीता साठा केलेला आढळून आला. सदरचा माल दोन पंचांसमक्ष विद्यालयात हजर असलेला इसम सचिन प्रकाश टेकाळे (२३ रा. सिव्हील लाईन, रिसोड) त्याचे ताब्यातून जप्त करून ताब्यात घेतला. जप्त केलेला सर्व मुद्देमाल पोलीस ठाणे रिसोड येथे ठेवण्यात आला असून पुढील कार्यवाहीसाठी अन्न व औषध प्रशासन विभाग अकोला यांच्याशी संपर्क साधून पत्रव्यवहार करण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांचे आदेशान्वये शिवा ठाकरे पोलीस निरीक्षक यांचे मार्गदर्शनात सपोनि विजय जाधव, सपोउपनि भगवान गावंडे, पोना सुनील पवार,राजेश राठोड, संतोष सेनकुडे व चालक गजानन जाधव यांचे पथकाने केली आहे.