कारंजात बंदीतही गुटखा विक्रेत्यांची चांदी!

By admin | Published: August 28, 2015 12:05 AM2015-08-28T00:05:42+5:302015-08-28T00:05:42+5:30

कारंजा शहर बनले गुटख्याचे मुख्य केंद्र; मध्य प्रदेशातून होत आहे गुटख्याची तस्करी.

Gutkha dealers' silver in bars! | कारंजात बंदीतही गुटखा विक्रेत्यांची चांदी!

कारंजात बंदीतही गुटखा विक्रेत्यांची चांदी!

Next

प्रफुल बानगावकर /कारंजा (जि. वाशिम): गुटखाबंदीचा आदेश हा केवळ कागदापुरताच र्मयादित राहिला आहे. शिक्षणाचे माहेर घर म्हणून ओळखल्या जाणार्‍या कारंजा शहरामध्ये सर्रास गुटख्याची विक्री होत असून येथील गुटखा किंग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यामध्येसुद्धा गुटखा पुरवत असल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली. बंदीच्या नावाखाली गुटख्याची किंमत दुपटीने वाढली असून, मध्य प्रदेश व आंध्र प्रदेशातून मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात गुटख्याची तस्करी सुरू असल्याचे दिसून येत आहे.
राज्य शासनाने गेल्या तीन वर्षांपासून राज्यात गुटखा बंदी केली आहे. मात्र, कारंजासह जिल्ह्यात सध्या मोठय़ा प्रमाणात अवैध गुटख्याची सर्रास विक्री होत असल्याचे दिसून येत आहे. मात्र अन्न व औषध प्रशासन विभागाकडून कोणत्याच प्रकारची कारवाई होत नसल्याचे अवैध गुटखा विक्रीवरून दिसून येते. आंध्र प्रदेशातून गुटख्याची तस्करी होत असताना कारंजा हे तस्करीचे प्रमुख केंद्र मानल्या जात आहे. हा गुटखा दुचाकी आणि कमांडर वाहनातून मोठ्या प्रमाणात येत असल्याची विश्‍वसनीय सूत्रांनी सांगितले. तस्करी करणारे वाहन हे कारंजा पयर्ंतच येते. तेथून जिल्हाभर गुटख्याचे वितरण होत आहे. त्यामुळे छुप्या मार्गाने गुटख्याची विक्रीही अव्वाच्या सव्वा भावाने होत आहे. यावर आता निबर्ंध कोण घालणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे.
गुटखा विक्रेत्यांवरील कारवाई म्हणजे मी मारल्यासारखे करतो तु रडल्यासारखे कर अशी काहीशी स्थिती येथील अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकार्‍यांची झाली असल्याची चर्चा आहे. त्यामुळे गुटखा विक्रे त्यांसह गुटखा शौकिनांचेही फावत असल्याचे दिसून येते.
यासंदर्भात अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त एस.एम.कोलते यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी जिल्ह्यात अवैध प्रमाणात गुटखा विक्री होत असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. तसेच याबाबत गुटखा विक्री करणार्‍यांवर कलम ३२८ नुसार कारवाई करण्यात येत असल्याचे सांगुन गुटखा निर्मूलनासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाची कटिबद्धता व्यक्त केली.

Web Title: Gutkha dealers' silver in bars!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.