मालेगावात १३.२५ लाखांचा गुटखा पकडला

By संतोष वानखडे | Published: August 9, 2023 06:24 PM2023-08-09T18:24:40+5:302023-08-09T18:24:48+5:30

रात्र गस्तीवर असताना परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाने ९ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास मालेगाव शहरातून १३.२५ लाखांचा अवैध गुटखा पकडला.

Gutkha worth 13.25 lakhs was caught in Malegaon | मालेगावात १३.२५ लाखांचा गुटखा पकडला

मालेगावात १३.२५ लाखांचा गुटखा पकडला

googlenewsNext

वाशिम: रात्र गस्तीवर असताना परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाने ९ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास मालेगाव शहरातून १३.२५ लाखांचा अवैध गुटखा पकडला असून, चार लाख रुपये किंमतीचे वाहनही जप्त केले. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांची साठवणूक, विक्री व वाहतूक करण्यावर शासनाने प्रतिबंध केला असूनदेखील काही इसम छुप्या मार्गाने तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांची साठवणूक, विक्री व वाहतूक करण्याचा प्रयत्न करतात. अशा आरोपींविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी दिले आहेत.

 परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक अमर मोहिते हे ९ ऑगस्टला रात्र गस्त करीत असताना, मालेगाव शहरातील एक इसम चारचाकी वाहनातून अवैध गुटखा वाहतूक करीत असल्याची गुप्त माहिती मिळाली. यावरून तपासणी केली असता, एमएच ३७ टी २४०४ क्रमांकाच्या वाहनातून प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक केली जात असल्याचे आढळून आले. १३ लाख २५ हजार ३६० रुपयांचा गुटखा आणि चार लाख किंमतीचे वाहन असा १७ लाख २५ हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मालेगाव पोलिस स्टेशनला आरोपींवर कलम १८८, २७२, २७३, ३२८ भादंवि सहकलम ५९ अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम अन्वये गुन्हा दाखल केला.

Web Title: Gutkha worth 13.25 lakhs was caught in Malegaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.