दोन वर्षांपासून जिप्सम खत अप्राप्त

By admin | Published: August 5, 2016 12:04 AM2016-08-05T00:04:51+5:302016-08-05T00:04:51+5:30

चिबडलेल्या शेतीसाठी जिप्सम खताची अत्यावश्यकता; मात्र वाशिम जिल्ह्यात पुरवठाच नाही.

Gypsum fertilizer uncovered for two years | दोन वर्षांपासून जिप्सम खत अप्राप्त

दोन वर्षांपासून जिप्सम खत अप्राप्त

Next

वाशिम, दि. ४ - शेतक-यांना सबसिडीवर देण्यात येणारे 'जिप्सम' खत वाशिम जिल्ह्यात गत दोन वर्षांपासून आले नसल्याची माहिती समोर येत आहे. यासंदर्भात शेतकरी अनभिज्ञ असून, शेतकर्‍यांची मागणी नसल्याने खताचा पुरवठा नाही, असा दावा कृषी विभागाने केला.
वाशिम जिल्ह्यात सरासरी चार लाख ९ हजार हेक्टर पेरणी क्षेत्र असून यावर्षी चार लाख तीन हजार ४६७ हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली आहे. सर्वाधिक अर्थात दोन लाख ८७ हजार २२६ हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला असून त्याखालोखाल तूरीचा पेरा ६३ हजार ५0१ हेक्टरवर झाला आहे. पाच हजार ८९७ हेक्टरवर एकूण तृणधान्याचा पेरा असून, ९१ हजार ४0५ हेक्टरवर एकूण कडधान्याचा पेरा आहे. १८ हजार ६३0 हेक्टरवर कपाशीची लागवड झाली आहे. जुलै महिन्यात संततधार पाऊस झाल्याने हलक्या प्रतीच्या अनेक जमिनी चिबडल्या. ऑगस्ट महिन्यातही दमदार पाऊस असल्याने मानोरा, कारंजा, रिसोड, वाशिम, मंगरुळपीर तालुक्यात शेतीचा बराचसा भाग चिबडून गेला आहे. त्यामुळे तूर, क पाशी, सोयाबीन आदी पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होत आहे.
चिबडलेल्या शेतीसाठी जिप्सम खताची अत्यावश्यकता असते, असा प्रगतशील शे तकरी व कृषी तज्ज्ञांचा दावा आहे. मानोरा तालुक्यातील काही शेतकर्‍यांनी जिप्सम ख ताबाबत कृषी विभागाकडे विचारणा केली असता, शासनाकडून जिप्सम खताचा पुरवठा झालाच नसल्याची माहिती समोर आला. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात विचारणा केली असता, गत दोन वर्षांपासून शासनाकडून जिप्सम खताचा पुरवठा बंद असल्याची धक्कादायक माहिती मिळाली. शेतकर्‍यांची मागणी नसल्याने हा पुरवठा बंद असल्याचा दावा करण्यात आला.


असा आहे जिप्सम खताचा फायदा..
1. क्षारयुक्त जमिनीतील सोडियम क्षारांचे कण जिप्सममुळे सुटे होतात. त्यामूळे ते बाहेर फेकले जाऊन जमीन सुधारण्याचा मदत होते. परिणामी, जमिनीची सुपीकता वाढते. जमीन भुसभुशी त होते. जमिनीची रचना बदलण्यास मदत होते.

2. जमिनीची धूप कमी होते. तसेच पाण्याबाहेर येणारे क्षार जिप्सममुळे कमी होतात, असा दावा कृषी तज्ज्ञांनी केला. पाण्याचा निचरा होऊन जमीन पाणथळ होत नाही तसेच जिप्सममुळे िपकाची अन्नद्रव्य शोषण क्षमता वाढते. पिकांना आवश्यक असलेला गंधक जिप्सममुळे मिळतो.

3. जिप्सममुळे पिकांची बाह्य कक्षा सुधारते आणि अन्नद्रव्ये जास्त शोषली जातात. सेंद्रिय पदार्थ लवकर कुजतात. जिप्सममुळे वातावरणातील जास्त तापमान पिके सहन करू शकतात.

Web Title: Gypsum fertilizer uncovered for two years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.