फासे पारधी बांधव योजनांपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2018 04:14 PM2018-09-08T16:14:08+5:302018-09-08T16:14:59+5:30

वाशिम: फासे पारधी समाज बांधवांना आवश्यक दाखले, कागदपत्रे मिळण्यास विलंब होत आहे.

gypsy comunity deprive from government scheme | फासे पारधी बांधव योजनांपासून वंचित

फासे पारधी बांधव योजनांपासून वंचित

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 
वाशिम: फासे पारधी समाज बांधवांना आवश्यक दाखले, कागदपत्रे मिळण्यास विलंब होत आहे. यामुळे विविध योजनांपासून ते वंचित असल्याने सत्यमेव जयते फाऊंडेशन या स्वंयसेवी संस्थेने आक्रमक पावित्रा घेत फासे पारधी बांधवांच्या सहभागाने डेरा आंदोलनाचा इशारा दिला आहे. 
शासन तुमच्या पालावर या योजनेंतर्गत फासे पारधी समाज बांधवांना प्रशासनाने त्यांच्या पालावर जाऊन चौकशी अहवालाच्या आधारे जातीचे दाखले, आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदान कार्ड, बँक खाते आदि सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे; परंतु वाशिम तालुक्यात या योजनेची अंमलबजावणी संथगतीने होत असल्याने सत्यमेव जयते फाऊंडेशनचे संस्थापक तथा जिल्हा भ्रष्टाचार निर्मुलन समिती वाशिमचे अशासकीय सदस्य परमेश्वर अंभोरे यांनी उपविभागीय अधिकारी वाशिम यांच्याकडे निवेदन सादर करून फासे पारधी बांधवांच्या सहभागाने डेरा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. फासे पारधी बांधवांना आवश्यक कागदपत्रे आणि दाखले उपलब्ध होत नाहित, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

Web Title: gypsy comunity deprive from government scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.