मंगरुळपीर शहरात पिसाळलेल्या माकडाचा हैदोस; पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2018 07:43 PM2018-01-09T19:43:44+5:302018-01-09T19:44:32+5:30

वाशिम: खायला न मिळाल्याने, तसेच माकडे पिटाळण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे मंगरूळपीर शहरात  एक माकड पिसाळले असून, मंगलधाम परिसरात गत सहा दिवसांपासून या माकडाने हैदोस घातला आहे. या माकडाला पकडण्यासाठी वनविभाग आणि वन्यजीवरक्षक शर्थीचे प्रयत्न करीत असून, सहाव्या दिवशी कारंजा येथून एक पिंजरा उपलब्ध करण्यात आला आहे.

Hados of Monkeypowder in Mangirlapir city; Trying to catch! | मंगरुळपीर शहरात पिसाळलेल्या माकडाचा हैदोस; पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न!

मंगरुळपीर शहरात पिसाळलेल्या माकडाचा हैदोस; पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न!

Next
ठळक मुद्देनागरिकांना घेतले चावे

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: खायला न मिळाल्याने, तसेच माकडे पिटाळण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे मंगरूळपीर शहरात  एक माकड पिसाळले असून, मंगलधाम परिसरात गत सहा दिवसांपासून या माकडाने हैदोस घातला आहे. या माकडाला पकडण्यासाठी वनविभाग आणि वन्यजीवरक्षक शर्थीचे प्रयत्न करीत असून, सहाव्या दिवशी कारंजा येथून एक पिंजरा उपलब्ध करण्यात आला आहे.
मंगरूळपीर शहरात काही महिन्यांपासून माकडांचे मोठमोठे कळप ठिकठिकाणी संचार करीत आहेत. जंगलात चारा आणि पाणी नसल्याने ही माकडे दिवसभर लोकवस्तीत संचार करतात. अशात त्यांच्याकडून धान्याची नासधूस होत आहे. या माकडांना पिटाळण्यासाठी नागरिक विविध प्रयत्न करीत आहेत. अशातच खायला न मिळाल्याने आणि नागरिकांच्या सततच्या त्रासामुळे मंगलधाम परिसरात संचार करणारे एक माकड पिसाळले असून, या माकडाने दोन तीन व्यक्तींना ईजाही केली आहे. लहान मुलांची सुरक्षा या माकडामुळे धोक्यात आली असल्याने नागरिकांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या माकडाचा बंदोबस्त करण्याची मागणी वनविभाग आणि मानद वन्यजीवरक्षक गौरवकुमार इंगळे यांच्याकडे करण्यात आली; परंतु या माकडास पकडण्यासाठी पुरेशी यंत्रणा नसल्याने वनविभाग आणि वन्यजीवरक्षकही हतबल झाले आहेत. दरम्यान, सहाव्या दिवशी मंगळवारी कारंजा येथील वनपरिक्षेत्र अधिकारी डोंगरे यांनी माकडास जेरबंद करण्यासाठी पिंजरा उपलब्ध करून दिला आहे. 
 
Web Title: Hados of Monkeypowder in Mangirlapir city; Trying to catch!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.