वाशिम जिल्ह्यात वादळासह गारपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2020 10:35 AM2020-05-12T10:35:51+5:302020-05-12T10:35:59+5:30

संत्रा फळबाग, भाजीपाला, आंब्याचे नुकसान झाले तर काही घरांवरील टिन उडून गेले.

Hail with storm in Washim district | वाशिम जिल्ह्यात वादळासह गारपीट

वाशिम जिल्ह्यात वादळासह गारपीट

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : शहरासह जिल्ह्यात विविध ठिकाणी रविवारी सायंकाळी ७ वाजतानंतर अचानक वातावरणात बदल होऊन १० ते १५ मिनिटे पाऊस व गारा पडल्या. यामुळे संत्रा फळबाग, भाजीपाला, आंब्याचे नुकसान झाले तर काही घरांवरील टिन उडून गेले.
वाशिम शहरात रविवारी दुपारनंतर ढगाळ वातावरण होते. सायंकाळी ७ वाजतादरम्यान थोडाफार पाऊस झाला. मंगरूळपीर, मालेगाव तालुक्यातील ग्रामीण भागात वादळवाऱ्याचा जोर अधिक असल्याने संत्रा, भाजीपाला व आंब्याचे काही प्रमाणात नुकसान झाले. या अवकाळी पावसामुळे गत काही दिवसांपासून उकाड्याचा सामना करणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मंगरूळपीर तालुक्यातील रात्री १० च्या सुमारास अवकाळी पावसामुळे फळबागा व भाजीपाला पिकांचे काही प्रमाणात नुकसान झाले. या पावसाने पालक, घोळ, वांगे, टमाटे यासह अन्य भाजीपाल्याचे नुकसान झाले.


नुकसानभरपाईची मागणी
 वादळवाºयामुळे काही नागरिकांच्या घरावरील टिन उडून गेले तर आंबा, संत्र्याचे नुकसान झाले आहे. अगोदरच्या शेतकºयांना विविध संकटांचा सामना करावा लागत आहे. त्यात अवकाळी पाऊस व वादळवाºयानेही नुकसान होत असल्याने शेतकºयांनी चिंता वाढली आहे. नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकºयांमधून होत आहे.

Web Title: Hail with storm in Washim district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.