गारपीट, अवकाळी पावसाचा पिकांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2019 02:45 PM2019-01-25T14:45:26+5:302019-01-25T14:46:03+5:30
कारपा (वाशिम) : कारपा, दोनद बु. परिसरात २४ जानेवारीला रात्री १२ वाजताच्या सुमारास विजेच्या कडकडाटात वादळी वाऱ्यासह गारपिट झाल्याने गहू, हरभरा व अन्य भाजीपालावर्गीय पिकांचे नुकसान झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
कारपा (वाशिम) : कारपा, दोनद बु. परिसरात २४ जानेवारीला रात्री १२ वाजताच्या सुमारास विजेच्या कडकडाटात वादळी वाऱ्यासह गारपिट झाल्याने गहू, हरभरा व अन्य भाजीपालावर्गीय पिकांचे नुकसान झाले. हातातोंडाशी आलेला पिकांचा घास अवकाळी पावसाने हिरावून घेतल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
२४ ते २६ जानेवारीदरम्यान अवकाळी व वादळी पावसाचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला होता. राज्यातील पूर्व भागातील हवामान अस्थिर होणार असल्यामुळे २४ ते २६ जानेवारी दरम्यान विदर्भात वादळी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. ढगाळी वातावरणामुळे विदर्भातील तापमान कमी होतील आणि किमान २९ जानेवारीपर्यंत तरी कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी राहिल, असा अंदाजही वर्तविला आहे. या अंदाजानुसार, २४ जानेवारीला रात्री १२ वाजताच्या सुमारास कारपा परिसरात वादळी वाºयासह गारपिट झाली. शेतात अनेक शेतकºयांनी काढणीसाठी तूर पीक कापून ठेवले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची एकच धांदल उडाली. या अवकाळी पावसाचा फटका गहू, हरभरा या पिकांनादेखील बसला आहे. महसूल तसेच कृषी विभागाने नुकसानग्रस्त भागाची पाहणी करावी आणि नुकसानभरपाईसंदर्भात वरिष्ठांकडे प्रस्ताव सादर करावा, अशी मागणी शेतकºयांनी केली. दरम्यान, दोनद बु. परिसरातही वादळी पावसामुळे गहू, हरभरा, संत्रा पिकाला जबर फटका बसला आहे.